"छावा’चित्रपट आला नसता तर सगळी आग बाहेर आली नसती. संभाजी राजेंना कसं मारलं हे दाखवलं तेव्हा ती आग बाहेर पडत आहे. धर्मांतरणापासून आपल्या भगिनीला वाचवलं पाहिजे."
सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) तसेच संभाजी महाराजांनी धर्मासोबत कधीही तडजोड केली नाही. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य पणाला लावलं. स्वतःच्या कुटुंबाचाही विचार न करता माझा हिंदू धर्म टिकायला हवा म्हणून लढा उभारला. त्यामुळेच आज आपण हिंदू म्हणून जगत आहोत, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी केले.