रत्नागिरी : मायक्रो फायनान्स कंपनीकडून (Microfinance Company) घेतलेल्या कर्जापोटीच्या हप्त्यांची वसुली जोर जबरदस्तीने केली जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. रत्नागिरीत १६ मायक्रो फायनान्स कंपन्या असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांनी वसुलीसाठी महिलांना दमदाटी केली किंवा रात्री-अपरात्री घरी जाऊन हप्ते वसुलासाठी तगादा लावला तर त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करा, अशा सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली.