Guhagar: महाविकास आघाडीचा पराभव; आमदार जाधव यांना धक्का

सहकार पॅनेलचे वर्चस्व; आमदार जाधव यांना धक्का, माजी नगराध्यक्ष मोरेंचाही पराभव
Guhagar taluka buying and selling union election
Guhagar taluka buying and selling union electionsakal
Updated on

गुहागर : तालुका खरेदी-विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनेलचे १२ तर महाविकास आघाडीचे ३ उमेदवार निवडून आले. ही निवडणूक आमदार जाधव यांनी प्रतिष्ठेची केली होती; मात्र त्यांचे प्रयत्न असफल ठरले.

या निवडणुकीत अनेक वर्षे गुहागर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, खरेदी-विक्री संघ, जिल्हा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्षपद भूषवणारे राष्ट्रवादीचे गुहागर तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले तसेच गुहागरचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान आमदार भास्कर जाधव यांचे निकटवर्तीय जयदेव मोरे यांचा पराभव झाला.

संचालकपदाच्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनेलचे रवींद्र अवेरे, सुरेश चौगुले, लक्ष्मण शिगवण, गणेश तांबे, नारायण गुरव व महाविकास आघाडीचे पंकज बिर्जे, पांडुरंग कापले या सर्वांना १० मते मिळाली.

विजयी ७ उमेदवारांमधून ६ संचालक निवडायचे होते. त्यामुळे विजयी ७ उमेदवारांच्या चिठ्ठ्यांमधून १ चिठ्ठी उचलून तो उमेदवार बाद करण्याचा निर्णय निवडणूक अधिकारी यांनी घेतला. त्यामध्ये सहकार पॅनेलचे नारायण गुरव यांना बाद करण्यात आले.

खरेदी-विक्री संघाच्या १५ संचालकपदासाठी निवडणूक होती. त्यापैकी छाननीमध्ये भटके विमुक्त प्रवर्गात सहकार पॅनेलचा एक अर्ज बाद झाल्याने महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष सचिन बाईत बिनविरोध निवडून आले होते; मात्र विकास सहकारी संस्था मतदारसंघातून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

सहकारी पॅनेलचे सहकारी संस्था मतदारसंघातून श्रीकांत महाजन १२ मते, डॉ. अनिल जोशी, शाम गडदे, सिराज घारे यांना ११ मते पडून विजयी झाले. रवींद्र अवेरे, सुरेश चौगुले, लक्ष्मण शिगवण, गणेश तांबे यांनी १० मते घेऊन तर महाविकास आघाडीचे पंकज बिर्जे, पांडुरंग कापले यांना १० मते मिळवून विजय मिळाला.

महिला मतदारसंघातून सहकार पॅनेलच्या अश्विनी जोशी, रश्मी घाणेकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया साळवी, सुवर्णा भोसले यांचा पराभव केला.

इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून सहकार पॅनेलचे तवसाळ पडवे सोसायटी चेअरमन सुभाष कोळवणकर यांनी माजी नगराध्यक्ष व विद्यमान आमदार भास्कर जाधव यांचे निकटवर्तीय जयदेव मोरे यांचा पराभव केला.

मागासवर्गीय मतदारसंघात सहकार पॅनेलचे पंचायत समिती माजी सभापती सुरेश सावंत यांनी अनंत पवार यांचा धुव्वा उडवला. या निवडणुकीतील विशेष बाब म्हणजे अनेक वर्षे गुहागर सोसायटी, खरेदी-विक्री संघ, जिल्हा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्षपद भूषवणारे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर यांना लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.

आमदार जाधव यांनी या निवडणुकीत जातीने लक्ष घातले होते. मतदारांची संख्या कमी असल्याने आमदार जाधव यांच्या प्रभावामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल असे वातावरण होते; मात्र महाविकास आघाडीचे केवळ ३ उमेदवार निवडून आले. त्यामुळे या पराभवाने आमदार जाधव यांना धक्का बसला आहे.

  • राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर पराभूत

  • सचिन बाईत बिनविरोध

  • ७ उमेदवारांना समान मते

  • चिठ्ठी काढून १ उमेदवार केला बाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com