
प्रत्येक प्राण्याला काही मूलभूत गरजा आहेत. त्यातील पहिली गरज ही आहाराची आहे. सर्व प्राणी आहारासाठी धडपडत असतात. श्री वेंकटेश स्तोत्रामध्ये कवी देवांना म्हणतो, ‘पोटासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा’. आपण अन्न मिळवण्यासाठी धडपडत असतो; पण तेच अन्न कसे खावे, याची मात्र आपल्याला कल्पना नसते. संत या विषयी सुद्धा उत्तम मार्गदर्शन करतात.
धनंजय चितळे, चिपळूण