esakal | दिव्यांग रुपेश यांच्या जिद्दीला सलाम! गादी वाफ्यावर केली भात पेरणी
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग रुपेश यांच्या जिद्दीला सलाम! गादी वाफ्यावर केली भात पेरणी

दिव्यांग रुपेश यांच्या जिद्दीला सलाम! गादी वाफ्यावर केली भात पेरणी

sakal_logo
By
सचिन माळी.

मंडणगड : विन्हे येथील प्रयोगशील शेतकरी रूपेश पवार यांनी दिव्यांग असतानाही शेतीत (farming experiment) केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. अपंगत्वावर मात करत ते आजही त्याच जोमाने शेती करत आहेत. रूपेश यांनी शेतीत विविध यशस्वी प्रयोग केले असून, आधुनिक (techonology) तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. (handicapped one person best farming in vinhe ratnagiri)

रूपेश पवार दोन्ही पायांनी अपंगत्व असूनही शेती अभ्यास, आधुनिकतेची कास आणि यांत्रिकीकरणाची साथ याच्या आधारे प्रगतशील शेतकरी म्हणून आपली ओळख निर्माण केली. लहानपणी पोलिओ (polio) झाल्याने दोन्ही पायांनी अपंगत्व आले. कुढत न बसता लढायचं, असा निर्धार करून उराशी मोठी स्वप्न घेत शेती करण्याचा निर्धार केला. मंडणगड पंचायत समिती कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी यंदा गादी वाफ्यावर भातपेरणीचा प्रयोग केला आहे.

हेही वाचा: सावधान! मधुमेहींमध्ये वाढला म्युकरमायकोसिस

चारसुत्री, एसआरटीचे नवनवीन तंत्रज्ञान आले तरीही बहुतांशी शेतकरी आजही पारंपारिक पद्धतीने भातशेती करीत आहेत. कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, पवन गोसावी यांनी शेतावर जाऊन गादी वाफा तयार करून त्यावर भात पेरण्याचे प्रात्यक्षिक दाखवल्याची माहिती रूपेश पवार यांनी दिली. यासाठी प्रो अॅग्रो कंपनीचे अराईज ६४४४ या संकरित बियाण्याचा वापर करण्यात आला.

शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसायही

आजपर्यंत कलिंगड, काकडी, भेंडी, घेवडी, चवळी, बिट, मुळा, पालक, मेथी, मटार याचेही उत्पादन घेतले. शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय यामुळे आर्थिक लाभ करून घेतला आहे. अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, घरच्यांची व नातेवाइकांची साथ, मदत यामुळे रूपेश यांनी आपले अपंगत्व नाहीसे करून वेळोवेळी कर्तृत्व सिद्ध केले आहे.

रोपे काढायला हलकी, वेळ कमी, बियाणेही कमी

पारंपरिक पद्धतीमध्ये पालापाचोळा, शेणी, गवत भाजून भाजवळ करण्याची, दाढ भाजण्याच्या पद्धतीचा शेतकरी आजही अवलंब करीत आहेत. या पद्धतीने रोपे तयार केली तर लावणीच्या वेळी रोपे काढायला भरपूर वेळ लागतो व रोपेही तुटतात; मात्र हाच भात गादीवाफ्यावर रांगेत पेरला की रोपे काढायला हलकी असतात, वेळ कमी लागतो, बियाणेही कमी लागते. रोपेही तुटत नाहीत. अशा पद्धतीने गादीवाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती रूपेश पवार यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागास केली.

हेही वाचा: जात पडताळणीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत

भातपीक स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक

पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पातळी भातपीक स्पर्धेत भाग घेणार असल्याचेही रूपेश पवार यांनी सांगितले. कृषी प्रदर्शन, किसान गप्पा गोष्टी, चर्चासत्र यात त्यांनी ट्रेनिंग घेतले आहे. चारसूत्री पद्धतीने भात लागवड व सेंद्रिय खतांचा वापर करून भातपीक स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला.