खळबळजनक! आरोग्यचा सावळा गोंधळ ; स्वॅब न देताच रिपोर्ट पॉझिटिव्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खळबळजनक! आरोग्यचा सावळा गोंधळ ; स्वॅब न देताच रिपोर्ट पॉझिटिव्ह

खळबळजनक! आरोग्यचा सावळा गोंधळ ; स्वॅब न देताच रिपोर्ट पॉझिटिव्ह

कुडाळ (सिंधुदुर्ग) : स्वॅब (Swab) न घेताच येथील एका महिलेचा रिपोर्ट आरोग्य विभागाने (Health Department Sindhudurg) पॉझिटिव्ह दिल्याने या गंभीर बाबीकडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिपलक्ष्मी पडते व भाजप महिला कुडाळ अध्यक्ष ममता धुरी(Mamta Dhuri) यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी (K. Manjulaxmi)व तहसीलदार अमोल पाठक (Amol Pathak) यांचे लक्ष वेधले.

health department gave a positive report woman without taking a swab crime case sindhudurg

येथील एका महिलेला बाहेरगावी जायचे होते. यासाठी कोरोना टेस्ट आवश्‍यक असते म्हणून त्या ७ मे रोजी महिला रुग्णालय कुडाळ येथे गेल्या. त्यांची नावनोंदणी करण्यात आली व तुम्हाला बोलावण्यात येईल, असे रुग्णालयातून सांगण्यात आले; मात्र त्याचवेळी त्याचे बाहेरगावी जाणे चार दिवस लांबणीवर गेले. त्यामुळे त्यांनी स्वॅब दिला नाही.

दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. ८) रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचा फोन त्यांना आला. स्वॅब न घेताच रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याच्या धक्‍याने त्या गोंधळून गेल्या. आरोग्य यंत्रणेच्या या कारभाराबाबत संताप व्यक्त करीत त्यांनी कोरोना महामारी संकटात या गंभीर बाबीबाबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पडते व भाजप कुडाळ शहर महिला अध्यक्ष ममता धुरी यांचे लक्ष वेधले. या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व येथील तहसीलदार अमोल पाठक यांचे निवेदन देऊन लक्ष वेधले व या गंभीर प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली.

health department gave a positive report woman without taking a swab crime case sindhudurg

Web Title: Health Department Gave Positive Report Woman Without Taking Swab Crime Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sindhudurgcovid 19
go to top