esakal | रत्नागिरीत पावसाचा जोर वाढला : चांदेराई बाजारपेठेत भरले पुराचे पाणी ...
sakal

बोलून बातमी शोधा

 heavy flood in ratnagiri district  Flood water in Chanderai market in Ratnagiri

रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई पुलाला काजळी नदीच्या पुराचे पाणी लागले

रत्नागिरीत पावसाचा जोर वाढला : चांदेराई बाजारपेठेत भरले पुराचे पाणी ...

sakal_logo
By
मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई पुलाला काजळी नदीच्या पुराचे पाणी लागले. पाणी वाढू लागल्याने  बाजारपेठ भागातील व्यापारी व रहिवाशांनी कालची रात्र जागून काढली. आज सकाळी बाजारपेठ भागातही पाणी भरू लागले आहे. तसेच कोरोनामुळे चार महिने बाजारपेठ बंद होती आता पुरामुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होणार आहे. व्यापार्‍यांनी आपला सामान, माल सुरक्षित स्थळी नेला आहे.

कालपासून (3) पडणार्‍या मुसळधार पावसाने यावर्षी प्रथमच बाजारपेठेत पाणी आले. दरवर्षी एक ते दोन वेळा पुलाला पाणी स्पर्श करते. चांदेराई गावचे दादा दळी यांनी सकाळच्या वाचकांसाठी व्हिडियो आणि छायाचित्रे पाठवली आहेत. शासनाने तात्काळ मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा- दैव बलवत्तर! मांजरामुळे वाचले प्राण, घटना अंगावर शहारे आणणारी -

चांदेरामध्ये सकाळी 6 वाजल्यापासून पाणी वाढू लागले. साधारण सकाळी 9 च्या आसपास पाणी आणखी वाढले. त्यामुळे व्यापार्‍यांची धावपळ उडाली आणि दुकानातील सामान काढण्यासाठी त्यांची लगबग सुरू होती. चांदेराई बाजारपेठेमध्ये सुमारे लहान-मोठी अशी 100 हून अधिक दुकाने आहेत. तसेच शेजारीच लोकवस्ती असून अनेक घरांत लोक राहत आहेत. मात्र काल रात्रभर ते झोपू शकले नाहीत. पुराचे पाणी घरात घुसण्याची भीती असल्यामुळे त्यांनी रात्र जागवून काढली.

काल रक्षाबंधन व नारळीपौर्णिमा असल्याने नागरिक आनंदित होते. परंतु सायंकाळनंतर पुराचे पाणी वाढू लागल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली. गेल्या वर्षी काजळीला आलेल्या पुरामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. गेल्या वर्षीच्या महापुरामध्ये नुकसानग्रस्त व्यापार्‍यांना शासनाकडून चांगली मदत मिळाली होती. त्यामध्ये 27 घरे व सुमारे 130 दुकानदारांना मदत मिळाली.

हेही वाचा- कुठल्या जिल्ह्यात संस्थात्मक क्‍वारंटाईनमध्ये झाली सव्वा दोन हजारने वाढ... वाचा -

काजळी नदीच्या पुरामुळे चांदेराईप्रमाणे, टेंभ्येपूल, सोमेश्‍वर, काजरघाटी आदी सखल भागात पाणी शिरले. यामुळे शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. गेल्या वर्षीच्या आलेल्या महापुरामुळे भातशेती वाहून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. यंदा कोरोनामुळे चार महिने घरात बसलेल्या शेतकर्‍यांवर आता पुन्हा महापुराचे संकट ओढवणार आहे. 

हेही वाचा- दर्याला कोकणवासीयांची साद, काय मागीतलय मागणं? वाचा...


चांदेराईला दरवर्षीच महापुराचा धोका जाणवतो. बाजारपेठेत चांदेराई, पाली, टिके, हरचिरी, कुरतडे आदी ठिकाणच्या लोकांची दुकाने आहेत. पंचक्रोशीची लोकसंख्या 10 हजार हजार असून बाजारपेठेत सुमारे 3 हजार लोकसंख्या आहे. गेल्या वर्षी आलेल्या महापुरामुळे मोठे नुकसान झाले होते. त्या वेळी शासनाकडून भरपूर मदत मिळाली होती.’
- संयोग दळी,  माजी सरपंच, चांदेराई

संपादन - अर्चना बनगे
 

loading image