सुखद...! आता कोकणवासीयांची भविष्याची चिंता मिटली

heavy rain and dam overflow konkan sindhudurg
heavy rain and dam overflow konkan sindhudurg

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आतापर्यंत पडलेल्या 1600.825 मिलीमीटर पावसामुळे जिल्ह्यातील 13 लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. तर देवगड तालुक्‍यातील कोर्ले-सातांडी हा मध्यम प्रकल्प सुद्धा 100 टक्के भरला आहे. जिल्ह्यातील एकमेव असलेल्या तिलारी आंतरराज्य या मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा 69.34 टक्के भरला आहे. 

निसर्ग चक्रीवादळमुळे जिल्ह्यात 1 जूनपासूनच पाऊस दाखल झाला. सुरुवातीला हा यावेळी पाऊस पडल्यानंतर जिल्ह्यात मौसमी पाऊस दाखल झाला; मात्र दाखल झाल्यापासुन हा पाऊस अविरत कोसळत आहे. त्यामुळे जून महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील नदी, नाले, ओहोळ तुडूंब भरून वाहू लागले होते. तर पावसाने सातत्य राखल्याने जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या धरणातील पाणी साठा झपाट्याने वाढू लागला होता. जुलै महीना सुरु होवून सात दिवस झाले तरी पाऊस सातत्याने कोसळत असल्याने या धरणांतील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. 

यामुळे देवगड तालुक्‍यातील कोर्ले - सातांडी मध्यम प्रकल्प 100 टक्के भरला असून सध्या या प्रकल्पातून 3 घनमीटर सेकंद विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील एकमेव मोठा प्रकल्प असलेल्या तिलारी आंतरराज्या प्रकल्पामध्ये सध्या 310.2090 दशलक्षघनमीटर पाणीसाठा असून सध्या हा प्रकल्प 69.34 टक्के भरला आहे. तर देवघर मध्यम प्रकल्पामध्ये 49.6140 दशलक्षघनमीटर म्हणजेच 50.62 टक्के आणि अरुणा प्रकल्पामध्ये 31.8800 म्हणजेच 45.33 टक्के पाणीसाठा झाला आहे. 

जिल्ह्यातील लघु पाटबंधारे असलेले शिवडाव, आडेली, आंबोली, हातेरी, माडखोल, निळेली, सनमटेंब, पावशी, शिरवल, पुळास, हरकुळ, ओझरम, लोरे हे 13 प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. हरकुळ प्रकल्पातून सध्या 14.65 घनमीटर सेकंद इतका विसर्ग सुरू आहे. 

लघु पाटबंधारे प्रकल्प पाणीसाठा (दशलक्षघनमीटरमध्ये) 
- शिवडाव - 2.6480 (100 टक्के) 
- नाधवडे - 3.0397 (69.59 टक्के) 
- ओटाव - 2.8012 (59.85 टक्के) 
- देंदोनवाडी - 1.1448 (11.68 टक्के) 
- तरंदळे - 0.6280 (13.78 टक्के) 
- आडेली - 1.2880 (100 टक्के) 
- आंबोली - 1.7250 (100 टक्के) 
- चोरगेवाडी - 1.8720 (58.50 टक्के) 
- हातेरी - 1.9630 (100 टक्के) 
- माडखोल - 1.6900 (100 टक्के) 
- निळेली - 1.7470 (100 टक्के) 
- ओरोस बुद्रूक - 1.0400 (43.23 टक्के) 
- सनमटेंब - 2.3900 (100 टक्के) 
- तळेवाडी - डिगस - 0.8650 (34.54 टक्के) 
- दाभाचीवाडी - 1.7440 (72.04 टक्के) 
- पावशी - 3.0300 (100) 
- शिरवल - 3.6800 (100 टक्के) 
- पुळास - 1.5080 (100 टक्के) 
- वाफोली - 1.2500 (53.65 टक्के) 
- कारिवडे - 0.7970 (57.55 टक्के) 
- धामापूर - 1.6410 (67.23 टक्के) 
- हरकुळ - 2.3800 (100 टक्के) 
- ओसरगाव - 0.7740 (57.80 टक्के) 
- ओझरम - 1.8190 (100 टटके) 
- पोईप - 0.7610 (65.43 टक्के) 
- शिरगाव - 0.3450 (21.81 टक्के) 
- तिथवली - 0.9170 (53.22 टक्के) 
- लोरे - 2.6960 (100 टक्के) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com