esakal | मुसळधार पावसाने `हा` रस्ता खचला; अवजड वाहतूक बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain Damage Veer Devpat Road Heavy Traffic Closed

तालुक्‍यात दोन दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसात काही ठिकाणी किरकोळ स्वरूपाची पडझड झाली आहे. वीर देवपाट येथे गुरुवारी (ता. 13) रात्री झालेल्या मुसळधार पावसाने गावाकडे जाणारा मुख्य रस्ता खचला आहे.

मुसळधार पावसाने `हा` रस्ता खचला; अवजड वाहतूक बंद

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चिपळूण ( रत्नागिरी ) - सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्‍यातील वीर - देवपाट येथील मुख्य रस्ता खचला आहे. या रस्त्यालगत असलेल्या दोन घरांनाही तडे गेल्याने धोका निर्माण झाला आहे. संबंधित कुटुंबीयांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. या मार्गावरील अवजड वाहतूक बंद केली आहे. 

तालुक्‍यात दोन दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसात काही ठिकाणी किरकोळ स्वरूपाची पडझड झाली आहे. वीर देवपाट येथे गुरुवारी (ता. 13) रात्री झालेल्या मुसळधार पावसाने गावाकडे जाणारा मुख्य रस्ता खचला आहे. या खचलेल्या भागापासून जमिनीला लांबवर तडे गेले आहेत.

यामध्ये रस्त्यालगत असलेल्या घरांना तडे गेले आहेत. त्यातील पार्वती रामचंद्र दुर्गुळी व शंकर भिकाजी जोगळे यांच्या घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे. या घरांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना महसूल विभागासह तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षाकडून दिल्या आहेत. हवामान खात्याने काही दिवसांपूर्वी कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानुसार गेले दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाने चिपळूणला झोडपले. 

14 ऑगस्टपर्यंत सरासरी 3110.85 मिमी पावसाची नोंद येथील तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षात झाली आहे. या अतिवृष्टीत देवपाट येथील मोगरीचे गावण येथील देवपाट ते कासे पेढांबे येथील डोंगरभागाशेजारी असणारा जिल्हा परिषदेचा रस्ता खचला आहे.

याची माहिती मिळताच वहाळचे मंडल अधिकारी चंदन जाधव, वीर येथील तलाठी एस. डी. कदम यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. खबरदारीचा उपाय म्हणून त्या दोन्ही कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या लेखी सूचना केल्या आहेत. येथील तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती नियंत्रण विभागातील अधिकारी कदम यांनीही तहसीलदार जयराज सूर्यवंशी व नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्या कुटुंबांना नोटीस पाठवल्या आहेत.