Konkan Rain: बांद्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस

rain
rain sakal
Updated on: 

बांदा (कोल्हापूर) : बांदा (Bandha) शहर व परिसराला दुपारी विजांच्या गडगडाटासह मुसळधार अवकाळी पावसाने झोडपून काढले. अचानक कोसळलेल्या पावसाने भात कापणी करणाऱ्या शेतकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. दिवाळी (Diwali)खरेदीसाठी शहरात आलेल्याना देखील अवकाळी पावसाचा सामना करावा लागला.

दिवाळी तोंडावर आल्याने बांदा परिसरात शेतकऱ्यांची भात कापणीसाठी लगबग सुरू आहे. मात्र आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने झोडपण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांची भातपिक वाचविण्यासाठी तारांबळ उडाली.

शहरातील किरकोळ भाजी विक्रेत्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. खरेदीसाठी बाजारात आलेल्या ग्राहकांना देखील पावसाचा फटका बसला. तब्बल एक तास पावसाची संततधार सुरू होती. विजा चमकत असल्याने शहरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com