esakal | रत्नागिरीत मुसळधार पाऊस; काजळी नदीला पुराची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीत मुसळधार पाऊस; काजळी नदीला पुराची शक्यता

रत्नागिरीत मुसळधार पाऊस; काजळी नदीला पुराची शक्यता

sakal_logo
By
राजेश कळंबटे/

रत्नागिरी : भारतीय वेधशाळेने 14 आणि 15 जून रोजी रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यानुसार संध्याकाळपासून पावसाने रत्नागिरी तालुक्याला झोडपून काढलं.

दिवसभर पावसाने विश्राती घेतली होती. मात्र सायंकाळी जोरदार पाऊस सुरु झाला. रात्री पावसाचा वेगळा वाढला. वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस पद होता. तालुक्यातील काजळी नदीला पूर आला असून पाणी चांदेराई बाजारात भरण्याची शक्यता आहे. दरम्यान सोमेश्वर मोहल्ला नदीचे पाणी पात्राबाहेर वाहू लागलं आहे. लोक सतर्क झाले आहेत.

▪️ रत्नागिरीत पडणाऱ्या पावसाची सद्य स्थिती

▪️ रत्नागिरी शहरात अनेक सखल भागात पाणी भरु लागले आहे.

▪️पाणी लोकांच्या घरात घुसू लागले असून नगर पालिकेने गटारांची न केलेली कामे आणि खोदून ठेवलेले रस्ते याचा मोठा फटका शहरवासीयांना बसू लागलाय.

▪️रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई येथेही पाणी भरू लागले असून नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे.

▪️पावसाचा हा जोर कायम राहिला तर पाणी पुलावरून जाण्याची शक्यता आहे

नागरिकांनी सुरक्षित राहा, स्वतःची, कुटुंबाची काळजी घ्या.

चांदेराई येथे NDRF चे पथक दाखल. तलाठी घटनास्थळी रवाना.

loading image
go to top