सिंधुदुर्गमधील 'या' तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे घरांसह गोठ्यांचे नुकसान...

रूपेश हिराप
Wednesday, 5 August 2020

सोसाटयाच्या वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांचे, गोठ्यांचे नुकसान झाले आहे.

सावंतवाडी : तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने ग्रामीण भागाला झोडपून काढले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांचे, गोठ्यांचे नुकसान झाले आहे. झाडे उन्मळून वीज तारांवर पडल्याने नुकसान झाले आहे. परिणामी ग्रामीण भागातील काही गावात दोन दिवसापासून वीज पुरवठा खंडित आहे. पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. परिणामी पुराच्या पाण्यामुळे काही ठिकाणचे वाहतूक मार्गही बंद झाले आहेत.

हेही वाचा - बंदी उठल्यानंतर चौथ्या दिवशीच लागला  ‘ब्रेक’, मच्छीमारांचा हिरमोड ...

गेल्या तीन दिवसापासून सावंतवाडी तालुक्यामध्ये पावसाने जोर धरला असून वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड होऊन स्थावर मालमत्तेसह वीस जणांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये ग्रामीण भागामध्ये मोठा फटका बसला असून अनेकांच्या घरांचे छप्परासह पडवी, गोठ्यांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - चांदेराई बाजारपेठेत पाणीच पाणी ; भरती वेळी पाणी वाढण्याची शक्यता...

मंगळवारी रात्रभर सुरु असलेल्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे बराच काळ वाहतूक ठप्प होती. तालुक्यातील मळेवाड नदीला पूर आल्याने नदीलगतच्या भातशेतीत पाणी शिरले आहे. तर काही ठिकाणी नदीवर असलेल्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतुक काही काळ ठप्प होती. पावसामुळे एकुणच जनजीवन विस्कळीत झाले आहे.

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in sawantwadi damage house and cowshed