कोकण मुंबई गोवा महामर्गावर झाड कोसळले हा झाला रस्ता बंद....

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार मंगळवारी सकाळपासून वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर येथे झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे. संगमेश्वर बस स्थानका जवळील रस्त्यावर हे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. चिपळूण मध्ये शिपोशी बंदर उमरोली बाणकोट रस्त्यावर दरड कोसळली असून तो मार्ग बंद ठेवण्यात आला आहे.हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार मंगळवारी सकाळपासून वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसाने जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे

हेही वाचा- ब्रेकिंग - रत्नागिरीत सापडले ३१ कोरोना पॉझिटिव्ह....

जिल्ह्यात मागील चोवीस तासात 24.11मिमी सरासरी पाऊस झाला आहे. त्यात मंडणगड 40,  दापोली 23, खेड 27,  गुहागर 15,  चिपळूण 20,  संगमेश्वर 23, रत्नागिरी 5, लांजा 27,  राजापूर 37 मिमी पाऊस झाला. मंगळवार सकाळपासून पावसाने तुफान हजेरी लावली आहे. रत्नागिरी शहरात मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचले होते.

हेही वाचा-अठरा गावांचे आरोग्य सांभाळणाऱ्या जैतापूर आरोग्य केंद्रात रिक्त पदांमुळे ससेहोलपट.... -

शिवाजी क्रिडांगणाजवळ रस्त्यावर पाणी साचले होते. चिपळूण मध्ये शिपोशी बंदर उमरोली बाणकोट रस्त्यावर दरड कोसळली असून तो मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. पावसाचा जोर आणि समुद्राला दुपारी आलेल्या भरतीने किनारपट्टी भागात भरतीचे पाणी घुसले होते. मिऱ्या, काळबादेवी आदी भागात उधाणाच्या लाटांचे तांडव सुरू झाले असून पुढील काही कालावधी किनारपट्टी भागात लाटांचे तांडव सुरू आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Ratnagiri district road collapsed and the road was closed