#KonkanRains वैभववाडी तालुक्याला झोडपले पावसाने

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

वैभववाडी - तालुक्याला आज पहाटे चारपासून पावसाने झोडपुन काढले. संततधारेमुळे तालुक्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी पुरसदृश्‍य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. शुक आणि शांती या दोन्ही नद्यांना पुर आला आहे. नदीकाठच्या भात शेतीत आणि बागायतीमध्ये पुराचे पाणी पसरले आहे. 

पहाटे सुरू झालेला मुसळधार पाऊस दुपारी बारावाजेपर्यत सुरू होता. पुराच्या शक्यतेमुळे तालुक्यातील बहुतांशी शाळांना दुपारनंतर सुट्टी देण्यात आली. शांती नदीचे पाणी पात्राबाहेरून पडले आहे. कोकिसरे नारकरवाडी येथे शेतीमध्ये पुराचे पाणी पसरले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rains in Vaibhavwadi Taluka