...अन् चेहऱ्यावर उमटले हसू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

पुन्हा गोव्यात कामावर जाता यावे यासाठी त्यांनी येथील मच्छीमार नेते बाबी जोगी यांचे लक्ष वेधले. त्यानुसार त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे पाठपुरावा केला

मालवण (सिंधुदुर्ग) - लॉकडाउन काळात जिल्ह्यात अडकलेल्या 11 खनिज वाहतूकचालक, कामगारांना अखेर आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून गोव्यात रवाना केले. दुसऱ्या टप्प्यात आणखी 20 जणांना पाठविण्यात येणार आहे. यासाठी मच्छीमार नेते बाबी जोगी यांनी पाठपुरावा केला. 

गोव्यातील बार्जवर चालक तसेच अन्य खाण कामगार म्हणून कामास असलेले जिल्ह्यातील अनेक कामगार लॉकडाउन काळात येथे अडकले होते. रोजगारासाठी त्यांना गोव्यात कामावर जाणे आवश्‍यक होते. हे सर्व कामगार जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील रहिवासी आहेत. पुन्हा गोव्यात कामावर जाता यावे यासाठी त्यांनी येथील मच्छीमार नेते बाबी जोगी यांचे लक्ष वेधले. त्यानुसार त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे पाठपुरावा केला.

अखेर पहिल्या टप्प्यात 11 कामगारांना गोव्यात रवाना केले असून, ते कामावर रुजू झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यात आणखी 20 जणांना गोव्यात पाठविले जाणार आहे. याबाबत सर्व खाण कामगारांनी आमदार नाईक, श्री. जोगी यांचे आभार मानले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Help to workers going to Goa