सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सीईओपदी हेमंत वसेकर रुजू  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hemant Vasekar New CEO Of Sindhudurg ZP

जिल्हा परिषदेच्या नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजूलक्ष्मी यांची जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी या पदावर बढती झाल्यानंतर हे पद रिक्त होते. तोपर्यंत या पदाचा पदभार सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पराडकर यांच्याकडे देण्यात आला होता.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सीईओपदी हेमंत वसेकर रुजू 

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शासनाने हेमंत वसेकर यांची नियुक्ती केली होती. श्री. वसेकर यांनी आज सायंकाळी या पदाचा पदभार प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्याकडून स्वीकारला आहे. 

श्री. वसेकर हे वसुंधरा वॉटरशेड डेव्हलपमेंट, पुणे येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत होते. तेथून शासनाने त्यांची सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती केली आहे. जिल्हा परिषदेच्या नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजूलक्ष्मी यांची जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी या पदावर बढती झाल्यानंतर हे पद रिक्त होते. तोपर्यंत या पदाचा पदभार सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पराडकर यांच्याकडे देण्यात आला होता. 

नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर हे बिडिओ केडरचे अधिकारी आहेत. पुणे येथील वसुंधरा वॉटरशेड डेव्हलपमेंट विभागात ते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते. तेथून शासनाने त्यांना बढती दिली असून सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती दिली आहे. येथे नियुक्ती झाल्यानंतर पुणे येथील त्यांच्या कार्यालयातून त्यांना मुक्त केले नव्हते. त्यामुळे ते येथे हजर झाले नव्हते. आज सायंकाळी हजर होत त्यांनी आपल्या नव्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. 

टॅग्स :Sindhudurg