विद्यार्थ्यांनो काळजी करू नका ; परीक्षा पुन्हा होतील

राजेश कळंबट्टे
Sunday, 4 October 2020

मुंबई विद्यापिठाच्या अंतिम वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परिक्षेत अडथळा निर्माण झाला आहे.

रत्नागिरी : ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तांत्रिक कारणामुळे होऊ शकल्या नसतील तर त्यांच्या परीक्षा पुन्हा घेतल्या जातील. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असा दिलासा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरवरून दिला आहे. 

हेही वाचा- तीन दिवसांच्या बाळाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी केले शर्थीचे प्रयत्न ; अखेर मिळाले यश -

मुंबई विद्यापिठाच्या अंतिम वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परिक्षेत अडथळा निर्माण झाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील पाच विद्यार्थ्यांना याचा अनुभव आला. याबाबत भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिपक पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हालचाली सुरु केल्या. आक्रमक पवित्र घेत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चाही सुरु केली होती. कला शाखेच्या पेपरला हा ऑनलाईन गोंधळ झाला होता. 

 

या प्रकाराची गंभीर दखल घेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ विद्यापीठाच्या कुलगुरूंना आदेश दिले आहेत. परीक्षा देऊ न  शकलेल्या विद्यर्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येईल. तशा सूचना विद्यपीठाला दिल्या आहेत. विदयार्थ्यांनी काळजी करू नये.सध्या श्री.  सामंत हे क्वारंटाईन आहेत.  मात्र घटनेचे गांभीर्य लक्षत घेऊन त्यांनी तातडीने पावले उचलत विद्यर्थ्यांना दिलासा दिला आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Higher and Technical Education Minister Uday Samant tweet for education exam subject