किती निष्काळजीपणा? देवगड-निपाणी मार्ग सात तास का झाला ठप्प? वाचा...

highway blocked due to falling tree at asalde konkan sindhudurg
highway blocked due to falling tree at asalde konkan sindhudurg

नांदगाव (सिंधुदुर्ग) - देवगड-निपाणी राज्य मार्गावर असलदे येथील धोकादायक वळणावर आज पहाटे महाकाय वटवृक्षाचा काही भाग कोसळला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तब्ब्ल सात तास ठप्प होती. यानंतर वटवृक्षाचा पडलेला भाग जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करत वाहतूक पूर्ववत करण्यात आली. रहदारी नसल्याने मोठी हानी टळली. ही घटना आज पहाटे घडली. 

या घटनेची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग, आपत्ती व्यवस्थापनाला देऊनही घटनास्थळी न पोहचल्याने तीव्र नाराजीचे पडसाद उमटत होते. अखेर सरपंच पंढरी वायंगणकर यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने वटवृक्ष बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. देवगड निपाणी राज्य मार्गावर अनेक भागात असणारे वटवृक्ष धोकादाक बनत आहे.

यामुळे यापूर्वीही वटवृक्ष पडून वाहतूक ठप्प होणे अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यातच ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर या मार्गावर आज असलदे येथील धोकादायक वळणार महाकाय वटवृक्षाचा काही भाग कोसळल्याने या मार्गावरील वाहतुकीला ब्रेक लागला. त्यातच पहाटेच्या दरम्यान वटवृक्ष पडल्याने मदतकार्य होवू शकत नसल्याने अनेक वाहनांना आपला मुक्काम घटनास्थळी करावा लागला तर काहींनी पुन्हा माघारी फिरत नांदगाव, तळेरे, कणकवलीचा मार्ग निवडला. उच्च दाबाच्या वाहिन्याही घटनास्थळी होत्या; मात्र सुदैवाने त्यांना कोणताही धोका नर्माण झाला नसल्याने अनर्थ टळला. 

सरपंचांसह स्थानिकांचा पुढाकार 
सरपंच पंढरी वायंगणकर, मधुकर परब आदींनी आपत्ती व्यवस्थापन कक्षास संपर्क साधला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही. वाहनांची संख्या वाढू लागल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रशासन दखल घेत नसल्याचे पाहिल्यानंतर वायंगणकर यांनी स्वखर्चाने नांदगावातून जेसीबी आणत सकाळी नऊच्या सुमारास वटवृक्षाचा कोसळलेला भाग हटविण्यास सुरवात केली. त्यामुळे पहाटेपासून अडकलेले गणेशभक्त, माल वाहतूक ट्रक, एसटी बस मार्गस्थ झाली. तब्बल सात तासानंतर वाहतूक सुरळीत झाली. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त झाला. 

उर्वरीत भाग कोसळण्याची शक्‍यता 
या वटवृक्षाचा अजूनही काही भाग शिल्ल्क असून तो कोसळण्याची शक्‍यता आहे. याठिकाणहून उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात असल्याने तिलाही धोका निर्माण होऊ शकतो. उर्वरीत वटवृक्षाचा भाग हटवण्याची मागणी हात असून यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाने तातडीने लक्ष घालून उर्वरीत भाग हटवावा. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com