

Conservation Push for 120 Ancient Stepwells Discussed in Mumbai Meeting
sakal
-मकरंद पटवर्धन
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात बारव (पायऱ्यांची विहीर) ११० ते १२०च्या आसपास आहेत. मंदिरांच्या शेजारीही बारव (कुंड) आहेत. तसेच, सामाजिक बांधिलकी आणि लोकांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून बांधलेल्या बऱ्याच बारव जिल्ह्यात आहेत. त्यातल्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या काही अत्यंत उत्तम स्थितीत आहेत. बारव संवर्धनासाठी शासनाने लक्ष घातले आहे, ही चांगली गोष्ट आहे. शासनाच्या सहकार्यातून या बारवांचे संवर्धन योग्यरीतीने करता येऊ शकते, अशी माहिती महाराष्ट्र बारव मोहिमेतील कार्यकर्ते श्रीरंग राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी दिली.