पतीने पत्नीचे डोकं आपटले दगडावर; दारूच्या नशेत पतीकडून घडली भयंकर घटना

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 January 2021

दारूच्या नशेत घरगुती भांडणातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे.

खेड (रत्नागिरी) :   पती- पत्नीच्या नात्यात विश्वासाला तडा गेला तर याचे रुपांतरण भयंकर घटनेत होत असते. आणि अशीच एक घटना भेसलई-कुपवाडी येथे घडली आहे. या  घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दारूच्या नशेत पतीकडून घडली भयंकर घटना

सुजिता सुरेश चव्हाण (वय ३७, आकले) असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास चव्हाण पती-पत्नीच्यात जोरदार भांडण झाले. या भांडणाचे रूपांतर  टोकाला गेले आणि हातापाईत सुजिताच्या पतीने तीचे डोके दगडावर आपटले. यामध्ये तीचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा तपास सुरू होता. त्यामुळे अधिक तपशील समजू शकला नाही. दारूच्या नशेत घरगुती भांडणातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे. पतीने दारूच्या नशेत झालेल्या भांडणाचा राग धरीत पत्नीचे डोके दगडावर आपटले. यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा- बस-कंटेनर धडकेत २८ प्रवासी जखमी -

पोलीसांतर्फे अधिक तपास 

भेसलई-कुपवाडी येथील ४० वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना समोर आली आहे.  ही घटना गुरुवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास उघडकीस आली. घटनास्थळी असलेल्या भेसलई-कुपवाडी येथे खेड पोलिस दाखल झाले. या  घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hitting a rock Wife brutal case ratnagiri khed