निसर्ग वादळ : नुकसानग्रस्त घरांना एवढी मिळणार भरपाई

How much compensation will be given to the damaged houses
How much compensation will be given to the damaged houses
Updated on

दाभोळ (जि. रत्नागिरी) : निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसून कोकणातील ज्यांच्या घरांचे अंशत: नुकसान झाले आहे, त्यांच्या खात्यात तातडीची मदत म्हणून पाच हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. संपूर्ण नुकसान झाले आहे, त्यांच्या खात्यात 25 हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. पैसे जमा झाल्यावर आपद्‌ग्रस्तांना बॅंकेमध्ये येण्याची गरज भासणार नाही. बॅंकाच त्यांना त्यांच्या ग्रामपंचायतीत पैसे देण्याची व्यवस्था करतील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दापोली येथे पत्रकार परिषदेत केली. 

निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या आंजर्ले, आडे व केळशी या भागाचा दौरा केल्यानंतर दापोली नगरपंचायतीच्या सभागृहात पत्रकार परिषदेत ते म्हणाले, "अंशत: नुकसान झालेल्यांना मदत म्हणून साडेसहा हजार रुपये, कपड्यायांचे नुकसान झाले आहे त्यांना एक हजार 800 व भाड्यांसाठी दोन हजार असे एकूण 10 हजार 300 रुपये मदत पंचनामे झाल्यानंतर देण्यात येणार आहे. घराचे पूर्ण नुकसान झाले आहे त्यांना 95 हजार रुपये देण्यात येणार आहेत. दापोली तालुक्‍यात सुमारे 32 ते 38 हजार घरांचे नुकसान झाले आहे; तर मंडणगड तालुक्‍यात 20 ते 25 हजार घरांचे नुकसान झाले आहे.'' 

दापोली व मंडणगड तालुक्‍यातील अंतर्गत रस्ते अजून सुरू करण्यात आलेले नाहीत. या रस्त्यांवर तसेच गावात मोठ्या प्रमाणात झाडे पडली आहेत. केवळ मुख्य मार्ग सुरू केलेले आहेत. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतींकडे झाडे कापण्यासाठी कटर आहेत, ते कटर चालविण्यासाठी इंधनाची तसेच ऑईलची व्यवस्था केली आहे. घराचे छप्पर उडून गेल्याने ज्यांच्या घरातील धान्य भिजले आहे त्यांच्यासाठी पाच किलो तांदूळ, एक किलो डाळ व एक लिटर रॉकेल असे साहित्य शासनातर्फे मोफत देण्यात येईल, असेही ते म्हणाले. 

यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, आ. योगेश कदम, नगराध्यक्षा परवीन शेख, उपविभागीय अधिकारी शरद पवार, तहसीलदार समीर घारे, मुख्याधिकारी महादेव रोडगे, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत आदी उपस्थित होते. सामंत यांनी खातेप्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेतला.

``सर्वांना मदत कशा प्रकारे करता येईल, या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे. आवश्यक ती सर्व मदत करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.``

उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com