esakal | संगमेश्वरात सेनेला खिंडार; शेखर निकमांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत
sakal

बोलून बातमी शोधा

संगमेश्वरात सेनेला खिंडार; शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत

संगमेश्वरात सेनेला खिंडार; शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संगमेश्वर (रत्नागिरी) : कसबा पंचायत समिती गणातील कळंबस्ते (Kalambaste) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार शेखर निकम (MLA Shekhar Nikam) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला. कळंबस्तेमध्ये सेनेला खिंडार पाडण्यात राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य मज्जीदभाई नेवरेकर यांची भूमिका महत्वपूर्ण ठरली.

संगमेश्वर तालुक्यातील कसबा पंचायत समिती गणामध्ये कळंबस्ते ग्रामपंचायतीत महानाट्य पाहायला मिळाले. जी ग्रामपंचायत सेनेच्या नेत्यांनी फोडाफोडीचे राजकारण करून आघाडी धर्माला बट्टा लावीत सेनेकडे घेतली, त्याच ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सदस्यासह सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली ती राष्ट्रवादीचे मज्जीदभाई नेवरेकर यांनी. पक्ष वाढीसाठी मज्जीदभाईंचे योगदान पाहून निकम यांनी विशेष कौतुक केले. राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्यांना शेखर निकम यांनी धन्यवाद देऊन आपण कायम आपल्यासोबत असल्याचा विश्वास दिला.

या वेळी उपसरपंच श्रीमती साबिया नेवरेकर, सदस्य अकबर काका दसुरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सेनेच्या स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, आम्ही सेनेचे निष्ठावान कार्यकर्ते होतो. ज्यावेळी कळंबस्ते मोहल्ल्यात सेनेचा एकही कार्यकर्ता नसताना आमची हार होणार हे माहिती असताना गावाचा विरोध पत्करून निव्वळ सेनेच्या प्रेमापोटी ग्रामपंचायत निवडणूक लढवत होतो. ज्यांनी आम्हाला शिव्याशाप दिले, ज्यांच्याबरोबर लढत दिली. त्यांनाच दिवस उजाडायच्या आत सेनेत प्रवेश दिला, तोही आम्हाला अंधारात ठे वून. एकीकडे आघाडीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत सरपंच हा आघाडीचाच होणार हा विश्वास देऊन ज्या नेतृत्वाने सर्वांचा विश्वासघात केला, अशा नेतृत्वाची चीड आल्याने या राजकारणाचा कंटाळा आल्यानेच आपण शेखर निकम यांच्यासारखे स्वच्छ नेतृत्व स्वीकारले.

हेही वाचा: कोल्हापुरात नियमांचा भंग: अध्यक्षासह 125 कार्यकर्त्यांवर गुन्हा

कळंबस्ते मोहल्ला हा निकम यांच्यासोबत असल्याचा विश्वास येथील ज्येष्ठ ग्रामस्थ शब्बीर बोट यांनी दिला आहे. सावर्डे येथील शेखर निकम यांच्या राष्ट्रवादी कार्यालयात निकम यांच्या उपस्थितीत साबिया नेवरेकर, अकबर काका दसुरकर, ग्रामस्थ इकबाल शेखदारे, शबाना पावसकर, साहिदा पावस्कर, नजीमा बोट, इब्रारार खान, शब्बीर बोट, रीमान पावस्कर, समिध डावे, बुरान बोट, अरमान मुल्ला, सामी नवरेकर, अहमद काझी, अब्दुल आशिफ नवरेकर, किफा नवरेकर, फैजान काझी, कैफ शेख, अयान वाडकर आदींनी प्रवेश केला.

loading image
go to top