शिकारीचा डावच आला अंगलट

hunters injured malvan sindhudurg
hunters injured malvan sindhudurg
Updated on

मालवण (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील एका गावात शिकारीदरम्यान बंदुकीची गोळी हाताला लागल्याने शिकारीच गंभीर जखमी झाल्याची चर्चा आहे. संबंधितावर कणकवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. तालुक्‍यातील एका गावात चार दिवसांपूर्वी शिकारीस गेलेल्या एका शिकारीच्या हाताला बंदुकीची गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याची माहिती मिळताच पोलिसांना संबंधिताकडे चौकशी केली. संबंधिताने पडवीत चुकून हाताला गोळी लागल्याचा जबाब दिला आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर चौकशी केली जाईल, असे आचरा पोलिसांनी स्पष्ट केले. 
जखमी झालेल्या व्यक्तीस शिकारीची सवय आहे. त्या दरम्यानच हा प्रकार घडला आहे. जखमी येऊन घरी येताना पडलेले रक्‍ताचे डाग हटविण्यात आल्याचीही गावभर चर्चा सुरू आहे. यात वापरलेली बंदूक संबंधित व्यक्तीच्या वडिलांच्या नावावर असल्याचे समजते. जखमी व्यक्ती आणि त्या गावातील बंद असलेले स्वस्त धान्याचे दुकान याबाबतचा धागाही पोलिस पडताळून पहात आहेत. 

संबंधिताने घरामागील पडवीत गोळी लागल्याची माहिती जबाबात दिली आहे. उपचारानंतर संबंधिताची चौकशी केली जाणार आहे. 
-जयदीप कळेकर, उपनिरीक्षक, आचरा पोलिस ठाणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com