पत्नीकडे पाहून हॉर्न वाजवतात म्हणून चारित्र्याच्या संशयातून पतीनेच केली मारहाण

husband wife disputes in ratnagiri doubt cases in ratnagiri
husband wife disputes in ratnagiri doubt cases in ratnagiri
Updated on

खेड (रत्नागिरी) : चारित्र्याच्या संशयातून पत्नीला लोखंडी सळीने मारहाण केल्याप्रकरणी पतीसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. महेश अनंत पेवेकर, सचिन पेवेकर दोघेही (रा. कुळवंडी-पेवेकरवाडी) यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल दाखल केला आहे. 

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश पेवेकर पत्नीसह रस्त्यावर फळे विक्रीचा व्यवसाय करतात. काही दिवसांपासून मार्गावरून जाणारे वाहनचालक पत्नीकडे पाहून हॉर्न वाजवतात, असा गैरसमज करत तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या संशयातूनच त्याने पत्नीला जाब विचारत मारहाण केली.

या प्रकरणी पत्नीने पतीसह तिघांविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पतीसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सत्यवान मयेकर करत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com