Hydro-Meteorological Latency: Delayed Monsoon Stalls Waterfall Discharges at Tamhini Ghat Segments
Sakal
पाली : माणगाव तालुक्यातील पाटणूस, भिरा, विळे, रवाळजे व पुण्याच्या सीमेवर असलेला ताम्हिणी घाट आदी परिसरात निसर्गाचा अमूल्य ठेवा दडला आहे. येथील अद्वितीय देवकुंड, रोमहर्षक खजिना व अंधारबन ट्रेक, समृद्ध निसर्ग, फेसाळणारे धबधबे देशभरातील पर्यटकांसाठी दरवर्षी पावसाळी पर्यटनाची मोठी पर्वणी ठरते. मात्र, यंदा जूनचा पंधरवडा उलटून गेला तरी रायगड जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन न झाल्याने या संपूर्ण परिसरातील पावसाळी पर्यटनाचा पुरता हिरमोड झाला आहे. पाऊस लांबल्याने पर्यटक नाराज असून, पर्यटक व निसर्गप्रेमींनी या भागाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.