आता इंधन म्हणून वापरता येणार हायड्रोजन; चारचाकी गाड्यांसाठी ठरणार उपयुक्त | Chiplun | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hydrogen-Fuel
आता इंधन म्हणून वापरता येणार हायड्रोजन; चारचाकी गाड्यांसाठी ठरणार उपयुक्त | Chiplun

आता इंधन म्हणून वापरता येणार हायड्रोजन; चारचाकी गाड्यांसाठी ठरणार उपयुक्त

चिपळूण : घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयातील(gharda engineering college) प्रा. रोहन कळमकर यांनी प्रक्रिया करून हायड्रोजन(hydrogen) वायूचा चारचाकी गाड्यांच्या बॅटरीचे इंधन म्हणून वापर करता येईल, असे संशोधन केले आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासावर आता पीएच.डी.ची मोहर मुंबई विद्यापीठाने(mumbai university) उमटवली आहे. हायड्रोजन वायूच्या अशा वापराने कोणतेही प्रदूषण होत नाही, हे महत्त्वाचे. त्यामुळे त्यांनी केलेल्या संशोधनाचे आगळे महत्त्व आहे. हायड्रोजन मूळ वायू स्वरूपात वापरणे कठीण आणि धोक्याचे असते.

हेही वाचा: सिंधूताई सपकाळ : आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये कार्यरत असलेल्या प्रा. रोहन कळमकर यांना नुकतीच मुंबई विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. ‘इन्व्हेस्टिगेशन ऑफ कन्ड्युसिव्ह प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड स्टेट मटेरिअल्स फॉर हायड्रोजन स्टोरेज फॉर मोबाईल ऍप्लिकेशन्स’ या विषयात त्यांनी केलेल्या संशोधनामुळे पदवी प्रदान करण्यात आली. प्रा. कळमकर यांचे अनेक शोधनिबंध जागतिक स्तरावर प्रकाशित झाले आहेत. जागतिक संशोधन परिषदेतही त्यांनी केलेल्या संशोधनाचे कौतुक झाले आहे. महाविद्यालयीन प्राध्यापकांनी केलेल्या अभ्यासाचा समाजासाठी उपयोग होतो, तेव्हा तो अभ्यास अधिक महत्त्वाचा ठरतो. अशाप्रकारे सर्वसामान्य जीवनाशी उपयुक्त असे कार्य केल्याबद्दल महाविद्यालयामध्ये तसेच समाजाच्या विविध स्तरातून प्रा. रोहन कळमकर यांचे अभिनंदन होत आहे.

पाणी बाहेर टाकले जाते

हायड्रोजन इंधन म्हणून वापरताना तो प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यामध्ये विभागला जातो. त्यापैकी प्रोटॉनचा हवेशी संयोग झाला की पाणी तयार होते. त्यामुळे एक्झॉस्टमधून पाणी बाहेर पडते. वेगळा झालेला इलेक्ट्रॉन हा ऊर्जा निर्माण करतो.

हेही वाचा: भंडारा जिल्ह्यात दिसले विदेशी पक्षी; विदर्भ स्थलांतरित पक्ष्यांचे आवडते ठिकाण

हायड्रोजन वायूचे पावडरमध्ये रूपांतर..

संशोधनाबद्दल माहिती सांगताना प्रा. कळमकर यांनी सांगितले की, चारचाकी गाडीत फ्युएल सेल बॅटरी असतेच. ती वीज उत्पादन करते आणि विजेवरील गाडी चालते. आपल्या वातावरणात हायड्रोजन भरपूर आहे. या बॅटरीसाठी हायड्रोजनचा वापर केला आहे. मात्र, वायुरूपात तो घातक असतो. त्याचा स्फोटही होऊ शकतो. त्यामुळे इंधन म्हणून त्या रूपात तो वापरणे हे अशक्य असते. तसेच त्याचा साठा करणे हेही आव्हान असते. यासाठी हायड्रोजन वायूचे रासायनिक प्रक्रियेद्वारे पावडरमध्ये रूपांतर करावयाचे, नंतर ही पावडर एका टँकमध्ये साठवायची, (या रूपात हायड्रोजन साठवणे अगदीच निर्धोक असते.) त्याला उष्णता दिली की पावडरच्या रूपातील हायड्रोजनचे रूपांतर वायूत होते आणि तो थेट बॅटरीला पुरवला जातो. यामुळे कोणताही धोका राहात नाही.

एक नजर

  1. प्रदूषणाची थोडीही शक्यता नाही

  2. पेट्रोलपेक्षा तिप्पट अॅव्हरेज

  3. इस्त्रो आणि टाटांनी घेतली दखल

  4. मोठ्या बसमध्ये वापरण्याचे प्रयोग सुरू

  5. द्रवरूप वापरणे गाडीसाठी तरी अशक्य

हेही वाचा: रायगड जिल्ह्यात हजारो किमीचा प्रवास करून देशी व विदेशी स्थलांतरित पाहुणे दाखल

प्रा. कळमकर म्हणाले, की हायड्रोजनचे द्रवरूप वापरणे गाडीसाठी तरी अशक्य ठरते. कारण ते साठविण्यासाठी क्रायोजेनिक तापमान लागते. म्हणजेच शून्य अंशाखालील तापमान गाडी चालविताना सांभाळणे केवळ अशक्य आहे. त्यापेक्षा पावडर रूपात हायड्रोजन वापरणे पूर्णपणे निर्धोक आणि वापरायला सोपे ठरते.या संशोधनादरम्यान मला जीआयटीच्या सर्व प्राध्यापक व विश्वस्तांचे सर्वतोपरी सहाय्य झाले. पत्नी, आई, कुटुंबीय, मित्रपरिवार या साऱ्यामुळे हे संशोधन करू शकलो.

-प्रा. रोहन कळमकर

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top