

Ichalkaranji Drug Case
esakal
इचलकरंजी : गणेशोत्सवात कालावधीत हद्दपार असतानाही शहरात परतून एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पोलिसांनी रंगेहात पकडले. शहापूर ओढा ते आरकेनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर केलेल्या कारवाईत पिंटू उर्फ धनाजी पांडुरंग जाधव (वय ३४, रा. कारंडे मळा, शहापूर, इचलकरंजी) याच्याकडून २८ ग्रॅम एमडीसदृश अमली पदार्थ जप्त केला. त्याची किंमत ५ लाख ४ हजार रुपये असून, मोबाईलसह एकूण ५ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.