वाल्हे (ता.पुरंदर) येथे महागाई राक्षसाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन किशोर कुदळे, वाल्हे

velhe
velhe

वाल्हे - नोटाबंदीच्या माध्यमातुन लघुउद्योग, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांवर वरवंटा फिरविणारे केंद्रातील मोदी सरकार हे जुमला सरकार आहे. त्यांनी अच्छे दिनच्या घोषणा फक्त सत्तारूढ होण्यासाठीच केल्याचे स्पष्ट झाले असुन, त्यांच्या काळामध्ये देशाचा जीडीपी दोन टक्क्यांनी कमी झाल्याने देशाचे तब्बल अडीच लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. मनमोहनसिंग सरकारच्या काळातील कच्च्या तेलाच्या दरापेक्षा निम्म्याने दर कमी असताना देखील महागाई प्रचंड वाढवुन शेतकरी, उद्योजक व सर्वसामान्य माणुस यांना लुटण्याचे काम हे सरकार करीत असल्याचा घणाघाती आरोप अर्थतज्ञ व पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांनी केला.

देशामधील पेट्रोल, गॅस आदि इंधनाचे दर गणगणला भिडलेले असल्याने देशामध्ये महागाई अतिउच्च स्थानावर जाणवुन ठेपली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे अर्थकारण बिघडले असुन देशामध्ये अराजकतेची परिस्थिती निर्माण झालेली आहे.याचा सरकारला जाब विचारण्यासाठी विरोधी पक्षांनी आज भारत बंदचे आवाहन केले आहे.त्या बंदला पाठिंबा देण्यासाठी वाल्हे (ता.पुरंदर) येथे महागाई राक्षसाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन व निषेध सभेचे आय़ोजन केले होते. त्यावेळी डॉ.दुर्गाडे बोलत होते. यावेळी अमोल खवले, दत्तात्रय पवार, सुनिल पवार, गोरख कदम, नारायण पवार, दिपक कुमठेकर, त्रिंबक माळवदकर, गोरख मेमाणे आदि उपस्थित होते.

दुर्गाडे पुढे म्हणाले कि, मोदींच्या जुमला सरकारने अच्छे दिनच्या घोषणा करताना महागाई कमी करणे, रूपयाचा विनीमय दर वाढविणे, प्रत्येक नागरिकच्या खात्यावर १५ लाख रूपये जमा करणे, भ्रष्टाचार संपविणे, शेतकऱ्यांच्या शेतीमालासा हमीभाव देणे, महिला सुरक्षा आदिंसाठी प्रयत्न करण्याच्या घोषणा केल्या होत्या.मात्र साडेचार वर्षानंतर मागे वळुन पाहिले असता यांनी केलेल्या सर्व घोषणा उलट्या दिशेने राबविताना दिसत आहेत.देशभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे.रूपयाचा विनीमय
दर निच्चांकी पातळीवर जाऊन कोसळला आहे.सर्वसामान्यांच्या खात्यामधील तुटपुंजी रक्कम सुद्धा वेगवेगळया कारणांनी शासन लुटत आहे. भ्रष्टाचार शिष्टातार झाला आहे.

शेतकऱ्यांना शेतीमाल रस्त्याच्या कडेला टाकुन द्यावा लागत आहे. देशभरात छेडछाडीला कंटाळुन महिला व मुलींना आत्महत्या कराव्या लागत आहेत.अशा खोटारड्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याचेही ते म्हणाले.

इंधनाचे वाढलेले प्रचंड दरांबाबत बोलताना ते म्हणाले कि, देशाचा जीडीपी एक टक्का कमी झाल्यास सव्वा लाख कोटी रूपयांचे नुकसान होते. दोन टक्के जीडीपी कमी झाल्याने अडीच लोख कोटी रूपयांचे नुकसान या सरकारने केले आहे.मनमोहन सिंग सरकारच्या काळात कच्च्या क्रुडतेलाचे दर प्रतिबॅलर १४० ते १४२ रूपये असताना ५० ते ५५ रूपये दराने पेट्रोल मिळत होते. मागील काही काळापुर्वी ४०-४५ रूपये प्रतीबॅलर दर असताना देशाचे मोठ्या प्रमाणावर परकिय चलन वाचले असतानाही 
६०-७० रूपये मोजावे लागत होते.तर आजरोजी आंतराष्ट्रीय बाजारात क्रुडतेलाचे दर ८० रूपये दरम्यान असताना जास्त रूपये रूपये मोजावे लागत आहे.याचा अर्थ शेतकऱ्यांना लघुउद्योजकांना लुटण्याचे काम सुरू असुन महागाई वाढण्याचे महत्वाचे कारण खऱ्याअर्थी डिझेल,पेट्रोल दरवाढ आहे.त्यामुळे या सरकारचा निषेध करावे तेवढे थोडेच असल्याचेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com