करोना पॉझिटीव्ह व्यक्ती जवळून गेली तर 'या' अॅपद्वारे कळते माहिती  

If the corona positive person passes information is known through the Setu app
If the corona positive person passes information is known through the Setu app

रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागात प्रत्येक आरोग्य केंद्रात कोविड आणि नॉन कोविडसाठी वैद्यकीय अधिकार्‍यांची नेमणूक केली आहे. तसेच कोरोना रुग्ण, हॉटस्पॉट शोध घेण्यासाठी सेतू अ‍ॅप प्रत्येकाकडे असावे या दृष्टीने आरोग्य विभाग प्रचार करत आहे. आतापर्यंत सव्वालाख लोकांकडे सेतू अ‍ॅप आहे. सर्दी, ताप, खोकला, दमा असलेल्या रुग्णांची शोध मोहिम सुरू आहे, अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापुरकर यांनी दिली.

जिल्हा परिषद आरोग्य विभाग कोरोनासाठी सज्ज आहे. जिल्ह्यातील 67 प्राथमिक आरोग्य केंद्रात एक वैद्यकीय अधिकारी कोविडसाठी तर दुसरा डॉक्टर विविध अन्य आजारांच्या तपासण्यासाठी नेमला आहे. त्यात टायफाईड, मलेरिया, डेंग्यूसह अन्य आजारांची तपासणी होते. गेल्या तीन महिन्यात चांगल्या पद्धतीने नियोजन सुरू असून डॉक्टर, कर्मचारी योग्य काळजी घेत काम करत आहेत. कोरोना रुग्ण सापडत असलेला गाव, वाडी विषाणू बाधित विभाग (कंटेनमेंट झोन) म्हणून जाहीर केला जातो. त्या भागातील ग्रामस्थांची तपासणी करण्याची जबाबदारी आरोग्य पथकांकडे आहे. कंटेनमेंट झोन नसलेल्या विभागातील पन्नास घरांचा सर्व्हे आरोग्य, आशा, अंगणवाडी सेविकांमार्फत सुरू आहे. होम क्वारंटाईन केलेल्या लोकांना त्या भेटी देतात. कोरोना बाधितांचा शोध घेण्यासाठी आरोग्य सेतू अ‍ॅप प्रत्येकाने डाऊनलोड करण्याच्या सूचना आरोग्य विभाग करत आहे.

कंटेनमेंट झोनमधील लोकांसाठी ते अत्यावश्यक केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सव्वालाख लोकांनी सेतू अ‍ॅप घेतले. त्या माध्यमातून हॉटस्पॉट, पॉझिटीव्ह व्यक्ती जवळून गेला तर त्याची माहिती मिळते. हायरिस्क विभागातील लोकांच्या संपर्कात असल्याचेही त्यावरुन समजते. कोरोनाशी निगडीत आजार असतील तर त्याची माहिती घेण्यासाठी अ‍ॅपवर हेल्पलाईन नंबरही आहेत. अ‍ॅप सगळ्यांनी घेतले तर हॉटस्पॉटची माहिती मिळणे शक्य होईल. जिल्ह्याची लोकसंख्या 16 लाख असून त्यातील पन्नास टक्के लोक अ‍ॅड्रॉईड मोबाईल वापरत असतील. त्या सगळ्यांकडे हे अ‍ॅप असावे यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. ही कार्यवाही जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

चक्रीवादळातील गावांकडे विशेष लक्ष

निसर्ग चक्रीवादळानंतर दापोली, मंडणगड या तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेने विशेष लक्ष केंद्रीत केले होते. या परिसरात साथींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरोघरी मेडिक्लोरचे वाटप केले गेले. गावातील आशा, अंगणवाडी सेविकांकडे आवश्यक औषधसाठा दिला गेला. मलेरिया, डेंग्यूची साथ पसरू नये यासाठी स्वच्छतेवर भर दिला गेला आहे. ग्रामपंचायतीमार्फत किनारी भागात साफसफाई सुरू आहे. हर्णैमध्ये वर्षभरापूर्वी साथ रोग उद्भवला होता. ते धोकादायक गावांमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी स्वतः पाहणी केली असे डॉ. कमलापुरकर यांनी सांगितले.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com