भोसले, बेटकर सध्या करतात काय?

Vijayrao Bhosale and Sahadev Betkar from Guhagar Assembly constituency disappear from political arena after 2019 Assembly elections
Vijayrao Bhosale and Sahadev Betkar from Guhagar Assembly constituency disappear from political arena after 2019 Assembly elections

गुहागर : गुहागर विधानसभा मतदारसंघातील विजयराव भोसले आणि सहदेव बेटकर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय पटलावरुन गायब आहेत. अनुक्रमे २०१४ व २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवणारे हे दोन्ही उमेदवार सध्या काय करत आहेत, असा प्रश्न कार्यकर्ते आणि मतदारांना पडला आहे. 


१९९९ पासूनच्या विधानसभा निवडणुकांचा आढावा घेतल्यास प्रमुख पक्षांचे पराभूत उमेदवार आजही राजकारणात सक्रिय आहेत. अपवाद फक्त दोन उमेदवारांचा विजयराव भोसले आणि सहदेव बेटकर. लोकसभा निवडणुकीत कार्यक्षेत्राची व्याप्ती मोठी असते. या निवडणुकीसाठी होणारे मतदान उमेदवारापेक्षा पक्ष, स्थानिक कार्यकर्त्यांचा प्रचार, राष्ट्रीय घडामोडी याच्या प्रभावातून होते. विधानसभेच्या बाबतीत क्षेत्र छोटे, प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा गावात वाडीत होणारा संपर्क, पक्ष कार्यकर्त्यांची मेहनत, यावर गणित अवलंबून असते.

स्वाभाविकपणे उमेदवाराला निवडून आलो नाही तरी तुमच्यासोबत राहीन हे सांगावेच लागते.  कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहावेच लागते. ते आपल्या पक्षातही क्रियाशील असतात. १९९९ पासूनच्या विधानसभा निवडणुकांचा आढावा घेतला तर चंद्रकांत बाईत (१९९९), रामदास कदम (२००९), डॉ. विनय नातू (२०१४) हे उमेदवार आजही कार्यरत आहे.( कै.) नंदुशेठ पवार (२००४) देखील राजकारणात सक्रीय होते. याला अपवाद आहे गुहागर विधानसभा मतदारसंघातील दोन उमेदवारांचा.


२०१४ च्या निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार विजयराव भोसले युतीची सत्ता असुनही गुहागरमध्ये फिरकले नाहीत. ते सक्रीय असल्याचेही समजलेले नाही, अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी या प्रमुख पक्षाचे उमेदवार सहदेव बेटकर होते. निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषद सदस्य, सभापती म्हणून ते सक्रीय होते. पण पराभूत झाल्यानंतर सहदेव बेटकरही सक्रीय नाहीत.

जबाबदारी राजकीय पक्षांवर
वास्तविक गेल्या वर्षभरात येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिशा देणारा नेता हवा होता. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने सहदेव बेटकरांचा येथील गावांशी, वाड्यांशी, कार्यकर्त्यांशी चांगला संपर्क होता. पराभूत झाल्यानंतरही ते येत राहिले असते तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाय रोवण्यास मजबूत संधी मिळाली असती. मात्र सहदेव बेटकर असोत किंवा विजयराव भोसले असोत दोन्ही उमेदवारांनी निवडणुकीचा उत्सव संपल्यावर प्रचारात घेतलेल्या आणाभाका, दिलेला शब्द पाळण्याची जबाबदारी राजकीय पक्षांवर सोपवली.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com