
बांदा (सिंधुदुर्ग) : टोलनाका येथे मिळालेल्या अवैद्य दारू वाहतूक प्रकरणाचे कनेक्शन थेट पुण्यापर्यंत असल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. यात पुण्यातील एका व्यक्तीचा समावेश असल्याचे समोर आले. ताब्यात असलेल्या संशयितांच्या म्हणण्यानुसार आपण गोव्यात येताना कांदे घेऊन येतो आणि जाताना दारू नेतो. त्यात आम्हाला दुप्पट पैसे मिळतात, अशी माहिती संशयिताने पोलिसांना दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही जण हाती लागण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या दोघांना काल सावंतवाडी येथील न्यायालयात हजर केले असता पुन्हा दोन दिवसाची पोलिस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. गोपाळ वाघबळ ढोमसे (वय ३२, रा. वाजरखेडा, ता. हलकी, जि. लातूर) व सतीश नामदेव कांबळे (२४, रा. येरगी, ता. देगलूर, जि. नांदेड) अशी त्यांची नावे आहेत. याकामी ॲड. स्वप्निल कोलगावकर यांनी काम पाहिले.
ट्रकच्या हौद्यात चोर कप्पे बनवून ही दारू वाहतूक सुरू होती. दरम्यान मुख्यालय पोलिस कर्मचारी धनाजी धडे यांनी सहकाऱ्यांसह कारवाई करत तब्बल २३ लाख ६७२ रुपयांच्या दारुसह ३४ लाख १० हजार ६७२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. ही कारवाई बांदा टोलनाका येथील थर्मल स्क्रिनिंग तपासणी नाक्यावर चार दिवसांपूर्वी करण्यात आली होती. या कारवाईत ११ लाख १० हजार रुपये किमतीचा ट्रक व गोवा बनावटीच्या विविध ब्रॅंडच्या दारूचे १३७ खोके जप्त करण्यात आली होते.
मोठे रॅकेट असण्याची शक्यता
दरम्यान, त्यांना ताब्यात घेतल्यावर सावंतवाडी येथील न्यायालयात हजर केले होते. या वेळी त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली होती. दरम्यान, त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यावर काल पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यामुळे बेकायदा दारू वाहतुकीत मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.