अबकारी खात्याची धडक कारवाई; गोवा बनावटीची 12 लाखाची दारु जप्त

अबकारी खात्याची धडक कारवाई; गोवा बनावटीची 12 लाखाची दारु जप्त
Updated on: 
Summary

गोव्यातून महाराष्ट्र हद्दीत गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

बांदा : गोव्यातून महाराष्ट्रात आयशर टेम्पोतून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करताना गोवा अबकारी खात्याने पत्रादेवी तपासणी नाक्यावर कारवाई केली. या कारवाईत १२ लाख १४ हजार ८८० रुपये किमतीच्या दारुसह एकूण २९ लाख १४ हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई उत्पादन शुल्क निरीक्षक अमोल हरवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी ८ वाजता करण्यात आली.

अबकारी खात्याची धडक कारवाई; गोवा बनावटीची 12 लाखाची दारु जप्त
मुंबै बँक घोटाळा | "बरबटलेल्या हातांनी सरकार काय चौकशी करणार?"

याबाबत सविस्तर माहिती अशी, गोव्यातून महाराष्ट्र हद्दीत गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार आज पहाटे अबकारी खात्याच्या पत्रादेवी येथील तपासणी नाक्यावर निरीक्षक अमोल हरवळकर, उपनिरीक्षक सलील वोल्वोईकर, अबकारी रक्षक दिलीप तिळवे, निलेश गावडे, शंकर परेकर, देविदास नाईक, विठोबा मालवणकर, सतीश तिळवे यांच्या पथकाने सापळा रचला होता. आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गोव्यातून सिंधुदुर्ग हद्दीत जाणाऱ्या आयशर टेम्पोला तपासणीसाठी थांबवण्यात आले.

अबकारी खात्याची धडक कारवाई; गोवा बनावटीची 12 लाखाची दारु जप्त
मुंबई-गोवा हायवेवर झालेल्या भीषण अपघातात तरुण जागीच ठार

टेम्पोच्या मागील हौद्याची तपासणी केली असता आतमध्ये गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या दारूचे ३३० खोके आढळले. पथकाने १२ लाख १४ हजार ८८० रुपये किमतीची दारू व १७ लाख रुपये किमतीचा टेम्पो जप्त केला. अधिक तपास निरीक्षक अमोल हरवळकर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com