
दापोली : शासनाचा ३० जुलैपर्यंत मासेमारीकरिता बंदीचे आदेश असून देखील आदेशाची पायमल्ली करत मुंबई आणि रायगडच्या हायस्पीड ट्रॉलर हर्णे बंदरासमोर बिनधास्त समुद्रात मासेमारी करताना दिसत आहेत. मत्स्यव्यवसाय खात्याच्या आदेशाला जुगारून बेकायदेशीररित्या मासेमारी करत आहेत मच्छीमारांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. यांना कोणाचे अभय मिळत आहे, अश्या संतप्त प्रतिक्रिया मच्छीमारांमधून व्यक्त होत होता.