शेर्लेत पावणेतीन लाखाची दारू जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हातभट्टी दारू

शेर्लेत पावणेतीन लाखाची दारू जप्त

शेर्लेत पावणेतीन लाखाची दारू जप्त

बांदा: गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या मोटारीवर बांदा पोलिसांनी कारवाई केली. शेर्ले येथील डिवाईन मर्सी येथे शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कारवाई करत दोन लाख ७० हजार ६८७ रुपयांच्या दारूसह ५ लाखांची मोटार, असा एकूण ७ लाख ७० हजार ६८७ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तर विनापरवाना दारू वाहतूक केल्याप्रकरणी राहुल राजाराम जाधव (वय २९, रा. कल्याण, जिल्हा ठाणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रोहित कांबळी व प्रथमेश पोवार यांनी कासहुन सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीला (एमएच ०५ डीएस ३१०२) पकडले.

Web Title: Illegal Liquor Action Against

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top