खळबळजनक ;  बांद्यात सापडल्या झिलेटिंच्या कांड्या व स्फोटके अन्......

Illegal zealots and explosives were found in the canal near High Valley Hotel at Gadgewadi in Banda cit
Illegal zealots and explosives were found in the canal near High Valley Hotel at Gadgewadi in Banda cit
Updated on

बांदा (सिंधुदुर्ग) : बांदा शहरातील गडगेवाडी येथील हाय व्हॅली हॉटेल नजीक कालव्यात बेकायदा झिलेटिंच्या कांड्या व स्फोटके आढळल्याने एकच खळबळ उडाली. ओरोस येथून बॉम्बशोधक व नाशक पथकाने घटनास्थळी येत झिलेटिनच्या कांड्या सुरक्षितरीत्या निकामी केल्या. यावेळी सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक व बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव उपस्थित होते.


 आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये राहणाऱ्या श्रीकांत पेनमूच यांनी कालव्याच्या रस्त्यावर पडलेल्या कांड्या पाहिल्या. त्याने याची कल्पना हॉटेल प्रशासनाला दिली. त्यानंतर तात्काळ या घटनेची खबर बांदा पोलिसांना देण्यात आली. ओरोस येथील बॉम्बशोधक व नाशक पथकाला तात्काळ पाचारण करण्यात आले.

हेही वाचा- Photo : शिल्लक राहिले फक्त अश्रू आणि अश्रूच.....
   घटनास्थळी पोलिसांनी परिसर सील केला. बॉम्बशोधक पथकाचे सुधीर आंगणे, वासू वरवडेकर, महेश घाडीगावकर, समीर कोचरेकर यांच्या पथकाने सुरक्षित अंतर ठेवून या कांड्या निकामी केल्या. यावेळी 'शेरा' श्वानच्या साहाय्याने कालव्यात व परिसरात स्फोटकांचा शोध घेण्यात आला. संपूर्ण परिसर मेटल डिटेक्टरने पिंजून काढण्यात आला. मात्र अजून स्फोटके मिळाली नाहीत. घटनास्थळी बांदा पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com