esakal | देवरुख,संगमेश्वरात घरगुती गणेशमूर्तींचे उत्साहात विसर्जन
sakal

बोलून बातमी शोधा

विसर्जन

देवरुख,संगमेश्वरात घरगुती गणेशमूर्तींचे उत्साहात विसर्जन

sakal_logo
By
प्रमोद हर्डीकर

साडवली : कोरोनाचे नियम पाळत यंदाही घरगुती गणेशोत्सव साजरा झाला.१० तारखेला आलेले गणराय १४ तारखेला स्वगृही परतले.भाविकांनी पाच दिवस गणपतीची मनोभावे पुजा,सेवा केली व १४ तारखेला या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

देवरुख व संगमेश्वर तालुक्यात हा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.देवरुख येथे सप्तलिंगी नदीवर विविध घाटावर भाविकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले.देवरुख नगरपंचायतीने आपतकालीन यंञणा सज्ज ठेवली होती.घाटावर निर्माल्यकलश ठेवले होते.कृञिम तलाव तयार करण्यात आला होता.

गणेशोत्सवात देवरुख,संगमेश्वर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.होमगार्डही मदतीला होते.राजु काकडे हेल्प अॅकॅडमी,सत्यनारायण प्रासादिक बालमिञ समाज खालची आळीचे कार्यकर्तेही नदीघाटावर मदतीसाठी हजर होते.

कोरोनाची बंधने असुनही भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाची पाच दिवस मनोभावे सेवा केली.कोरोनामुळे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम झाले नाहीत यामुळे कलेची देवता असुनही गणपतीसमोर कलाकारांना आपली कला सादर करता आली नाही.

loading image
go to top