मंडणगड तालुक्यातील पर्यटन जलमार्ग दळणवळणाबाबत विशेष मंडणगड पर्यटन विकास आरखडा तयार करण्यात येणार आहे.
मंडणगड : महायुतीस मिळालेल्या प्रचंड यशानंतर राज्याचे मुख्यमंत्र्यांसह प्रमुख मंत्री दावोस येथे परकीय गुंतवणूक आणण्यासाठी गेलेले असताना रायगडच्या (Raigad) पालकमंत्रिपदाबाबत प्रश्न निर्माण करून मिळालेल्या यशाला गालबोट लावण्याचे कृत्य अनाकलनीय आहे. महायुती व सरकारला हे शोभनीय नसल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.