सावंतवाडी : शक्तिपीठ महामार्गाला (Shaktipeeth Highway) होणारा विरोध म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला विरोध आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याने आपली हिरवळ जपली आहे. इथला हापूस आंबा नागपूर आणि दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरेल. हा महामार्ग रेडी बंदराला जोडला गेल्यास जिल्ह्याला मोठा फायदा होईल, असे मत माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी व्यक्त केले.