आयोजकांनी खेळण्याची विनंती केली, तेव्हा राणेंनी मैदानात उतरून आपले क्रिकेटमधील ‘स्ट्रोक’ दाखविले आणि सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला.
कुडाळ : मला जीवाला जीव देणारे सहकारी मिळाले, हे माझे भाग्य आहे, असे प्रतिपादन आमदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी पिंगुळी गुढीपूर येथील महापुरुष कला, क्रीडा, संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट स्पर्धेवेळी (Cricket Tournament) केले.