ओरोस : सिंधुदुर्गातील ज्या तेरा गावांमधून शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Highway) जाणार आहे, त्या गावामंध्ये मी, खासदार नारायणे राणे, भाजप व महायुतीतील मित्रपक्षाचे सहकारी जाणार आहोत. तेथील सर्व लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय व त्यांचे समाधान झाल्याशिवाय या महामार्गाचे काम सुरू करू नये, असे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.