दोडामार्ग : प्रत्येकाने स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा चरित्र ग्रंथ वाचला पाहिजे. त्यामुळे आपल्या जीवनातील प्रत्येक वळणावर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची चालना मिळते. छत्रपतींचे विचार आचरणात आणले तर जीवन जगणे अधिक सोपे होते, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी झरेबांबर येथे केले.