सुक्या मेव्याला मागणी वाढली ; प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होते मदत

improve to immunity power to eat suka meva like dry fruits demanded by buyers in ratnagiri
improve to immunity power to eat suka meva like dry fruits demanded by buyers in ratnagiri

चिपळूण : कोरोना संसर्गात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असलेल्या पौष्टिक सुका मेव्याच्या मागणीत १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. सुका मेव्याच्या मागणीत वाढ झाली असली तरी दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सुका मेवा उपयुक्त असल्याने गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून सुका मेव्याच्या मागणीत वाढ झाली आहे.

मागणीत १५ ते २० टक्के वाढ झाली असल्याची माहिती चिपळुणातील व्यापारी सतीश भोसले यांनी दिली. काजू, बदाम, बेदाणा, अक्रोडच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या बाजारात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तसेच मंगळुरू, गोवा, केरळ येथून काजूची आवक होत आहे. बदामाची आवक अमेरिकेतील कॅलिफोर्नियातून होत आहे. इराणमधील मॉमेरोन जातीच्या बदामाची आवक होत आहे. बेदाण्याची आवक सांगली येथील बाजारातून होत आहे.

बेदाण्याच्या नवीन हंगामाची सुरवात झाली असून मागणी चांगली आहे. अक्रोडची आवक दक्षिण अमेरिकेतील चिलीतून होत आहे. अमेरिकेतून अक्रोडची आवक होत असली तरी चिलीच्या अक्रोडची प्रतवारी चांगली आहे. इराण आणि अमेरिकेतून पिस्त्याची आवक होते. पुढील महिन्यात काश्‍मीरमधील अक्रोडचा हंगाम सुरू होईल. थंडीत सुका मेव्याच्या मागणीत वाढ होते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुका मेव्याला चांगली मागणी राहते, असेही त्यांनी सांगितले.

"सुका मेव्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. सुका मेव्यात ‘क’ जीवनसत्त्व अत्यल्प प्रमाणात असते; मात्र सुका मेव्यात क्षार आणि जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. आहार सर्वसमावेशक असावा. सुका मेव्यात पोषणमूल्य भरपूर आहे; मात्र सुका मेव्याचे सेवन बेताने करावे अन्यथा पित्त, बद्धकोष्ठता, मूळव्याध अशा विकारांना सामोरे जावे लागते."

-डॉ. विशाल पेटकर, शिरगाव

किलोचे दर असे 

- काजू ८०० ते ९०० रुपये 
- बदाम ६०० ते ६५० रुपये 
- बेदाणा १६० ते २२५ रुपये 
- पिस्ता खारा ७५० ते ९०० रुपये 
- अक्रोड १३०० ते १४०० रुपये 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com