कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने पालिका कर्मचाऱ्यांत आलेले नैराश्य घालविण्याचा `यांनी` उचललाय विडा

Increased Outbreak Of Corona Creates Frustration in Municipal Employees
Increased Outbreak Of Corona Creates Frustration in Municipal Employees

ओटवणे ( सिंधुदुर्ग ) -  कोरोनाचा विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता बृहन्मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्‍य येत आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी मुंबई महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विशेष कार्य अधिकारी आणि सावंतवाडी विलवडे गावचे सुपुत्र सुभाष यशवंत दळवी यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

बृहन्मुंबई महापालिका अखत्यारितील विविध खात्यांतील खाते प्रमुखांसह कर्मचारी अधिकारी यांचेसाठी कोविड-19 संदर्भात घ्यावयाची काळजी व उपाययोजना आणि तणाव मुक्तीकरिता वेळोवेळी विशेष कार्यशाळेचे आयोजन ते करीत आहेत. यातून अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्याचे ते उल्लेखनीय काम करीत आहेत. 

मुंबई शहरात कोविड-19 या रोगाचा प्रादुर्भाव बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता कार्यरत असलेले, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सर्व विभागातील विशेषतः रुग्णालयातील कामगार, कर्मचारी, अधिकारी हे कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे बाधीत होत आहेत. तसेच अद्यापपर्यंत महापालिकेतील 80 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. 

कोरोना वातावरणामुळे महानगरपालिकेच्या विधि खात्यातील कर्मचाऱ्यांच्या शरीरावर, मनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यातच विधि खाते, मुख्यालयातील 7 कर्मचायाना कोरोनाची लागण झाल्याने अन्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोरोनामुळे मृत्यु होईल या भितीने तसेच कुटुंबाचे भविष्यात कसे होईल या विचाराने कर्मचारी/अधिकारी यांचेवर ताण येत होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा, रक्तदाब वाढणे, रक्तामधील साखरेचे प्रमाण वाढणे, मनावर ताण वाढणे इत्यादी सारखी लक्षणे वाढीस आल्याचे दिसून येत होते. नकारात्मकता वाढणे इत्यादी सारखे दुष्परिणामही आढळून येत होते. 

अशा गंभीर परिस्थितीत दळवी यांनी सामाजिक कर्त्यव्याची जाणीव ठेवत वेळोवेळी कर्मचाऱ्यांसाठी तणाव मुक्ती कार्यशाळेचे आयोजन करत कोविड योद्‌ध्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम करीत आहेत. या कार्यशाळेमध्ये प्रशासनाची भूमिका, संकट समयी आपणास कसे खंबीरपणे उभे राहता येईल, तसेच कोरोना विषयीची जनजागृती व प्रतिबंधक उपाययोजना करताना स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेणे, रुग्णांची काळजी घेऊन समाजामध्ये आपल्या कामाचा आदर्श कसा उभा करावा याबाबतचे प्रेरणात्मक विचाराने उपस्थितांची सकारात्मक विचारसरणी उभी केली. 

आपल्यालाच मनपाची /शासकीय नोकरीची संधी का व कशी आणि कशासाठी मिळाली याबाबत प्रत्येक कर्मचाऱ्यांना स्वत:लाच प्रश्‍न विचारायला त्यांनी प्रोत्साहित केले. आपणच कोरोनोसारख्या संकटसमयी समाजाला कसा धीर व दिशा देऊ शकतो, आंतरिक ऊर्जा ही सकारात्मक विचाराने कशी वाढवू शकतो. मुंबई महापालिका आपल्या कर्मचाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबाची काळजी कशी घेत आहे आदी विषयांवर मार्गदर्शन करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com