kokan : मच्छीमारांचा बेमुदत उपोषणाचा इशारा ; सोमवारपासून आंदोलन

Indefinite hunger strike warning of fishermen kokan marathi news
Indefinite hunger strike warning of fishermen kokan marathi news
Updated on

हर्णै : दापोली-मंडणगड-गुहागर मच्छीमार संघर्ष समितीचे 22 मार्चपासून दापोली तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. याबाबत समितीने तहसीलदार व प्रांतांना निवेदन देण्यात आले आहे. 


महाराष्ट्र राज्यातील सागरी हद्दीमध्ये परप्रांतीय हायस्पीड बोटी व एलईडी लाईटद्वारे केली जाणारी पर्ससीन नेट मासेमारी या अनियंत्रित बेकायदेशीर मासेमारीमुळे सागरी मत्स्योत्पादनात कमालीची घट झाली आहे. परिणामी गेली 3 वर्षे कोकण किनारपट्टीवर मत्स्यदुष्काळ निर्माण झाला आहे. बेकायदेशीर मासेमारी रोखण्याबाबत शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे दिवसेंदिवस हायस्पीड बोटी व एलईडी बोटींची संख्या वाढत आहे. त्याची झळ पारंपरिक मच्छीमारांना बसली असून सध्या कोकण किनारपट्टीवर साधारणपणे 80 टक्के नौका बंदरामध्ये व खाड्यांमध्ये नांगरून ठेवल्या आहेत. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. 


मच्छीमार संघटनांकडून व मच्छीमारी सहकारी संस्थांकडून लोकप्रतिनिधींमार्फत अनेकवेळा शासनाकडे लेखी निवेदने, आंदोलने या सनदशीर मार्गाने बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करूनही शासनाने बेकायदेशीर मासेमारीला अभय देऊन डोळेझाक केली आहे. बेकायदेशीर मासेमारी तत्काळ थांबवावी व संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी संघर्ष समितीने बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे. हे उपोषण 22 मार्चला सकाळी 11 वाजल्यापासून तहसील कार्यालयासमोर करण्यात येणार आहे. 

फास्टर आणि पर्ससीन नौकांचे अतिक्रमण 
त्या निवेदनामध्ये दापोली-मंडणगड-गुहागर मच्छीमार संघर्ष समितीने फास्टर आणि पर्ससीन नौकांच्या होणाऱ्या अतिक्रमणामुळे हा पवित्रा घ्यावा लागत असल्याचे या निवेदनामध्ये व्यक्त केले आहे. 
 
दृष्टिक्षेपात.. 
परप्रांतीय हायस्पीड बोटी, एलईडी लाईटद्वारे मासेमारी 
अनियंत्रित, बेकायदेशीर मासेमारीमुळे मत्स्योत्पादनात घट 
गेली 3 वर्षे कोकण किनारपट्टीवर मत्स्यदुष्काळ 
कोणतीही ठोस कारवाई शासनाकडून नाहीच 


संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nitesh Rane BJP joining event Sindhudurg
Why Mumbai-Goa Highway work is delayed
Gopalgad Fort ownership dispute in Ratnagiri
Fishing boat trapped in creek Ratnagiri
Marathi News Esakal
www.esakal.com