Avishkar research convention: कोकणकन्येला विद्यापीठाचे रौप्य पदक

सॅनिटरी पॅडस् चे योग्य पद्धतीने विघटन न करता ते तसेच स्वच्छतागृहांमध्ये टाकलेले दिसतात.
guhagart
guhagartsakal

गुहागर : चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी अक्षता बापट हिने मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या अविष्कार संशोधन संमेलन स्पर्धेत त्या दिवसातील स्वच्छता साधने आणि पर्यावरण (Sanitary Waste and Environment) या विषयावरील रिसर्च प्रोजेक्ट मध्ये रौप्यपदक मिळवले आहे. अक्षता मूळची गुहागर तालुक्यातील पालशेत येथील असून,सोमय्या कॉलेजमध्ये M.A Psychology या विषयाचे शिक्षण घेत आहे.

guhagart
कारगिल युद्धाशी अभिनेत्री रविना टंडनचं मोठं कनेक्शन होतं;वाचा सविस्तर

"त्या" दिवसातील स्वच्छता साधने आणि पर्यावरण ह्या विषयाबद्दल सांगताना अक्षता म्हणाली की, सॅनिटरी वेस्ट अँड इन्व्हायरमेंट म्हणजेच "त्या" दिवसातील स्वच्छता साधने आणि पर्यावरण हा विषय जरी नाजूक असला तरीसुद्धा या विषयाबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण होणं हे फार गरजेचे आहे असं मला वाटते, आणि जर आपण बस स्टँडच्या किंवा रेल्वे स्टेशनच्या किंवा इतर सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतागृहाच निरीक्षण केले तर आपणा सर्वांनाच माहिती आहे की ते किती किळसवाणे चित्र असते! आणि अशातच यामध्ये सॅनिटरी पॅडस् चे योग्य पद्धतीने विघटन न करता ते तसेच स्वच्छतागृहांमध्ये टाकलेले दिसतात.

याच कारणासाठी मला असं वाटलं की ह्यावर काहीतरी उपाय शोधणं फार गरजेच आहे आणि म्हणून "त्या" दिवसातील स्वच्छता साधने आणि पर्यावरण या विषयावर मला रिसर्च प्रोजेक्ट सादर करावा असं वाटलं आणि या रिसर्च प्रोजेक्ट मध्ये आपण कशा पद्धतीने या कचऱ्याचे विघटन करू शकतो यासाठी एक model (प्रतिकृती) तयार केले होते ज्याचा उपयोग शहरांमध्ये किंवा गावांमध्येही करता येऊ शकतो. जेणेकरून समाजामध्ये हि जनजागृती व्हावी आणि याचा फायदा महिलांना व्हावा यासाठी हा विषय निवडला होता.

guhagart
रत्नागिरी : गावपऱ्यातील वहाळात मिऴाली बेवारस बालिका

सॅनिटरी वेस्ट आणि पर्यावरण या विषयवार कायमच कमी बोलले जाते आणि एखादी महिला जर त्या परिस्थितीतून जात असले तर तिला मदत करण्या ऐवजी तिला वाईट वागणूक अजूनही या समाजात दिली जाते. म्हणून मी हा विषय निवडला होता आणि या स्पर्धेची सुरुवात महाविद्यालयीन पातळीवर झाली होती.या स्पर्धेमध्ये एकूण सहा प्रकार असतात आणि युनिव्हर्सिटीच्या सगळ्या कॉलेजेस चे विद्यार्थी आणि त्यांचे प्रोजेक्ट्स यामध्ये असतात. सुरुवातीला कॉलेज पातळीवर निवड चाचणी प्रक्रिया होते , त्यानंतर सिलेक्ट झालेले रिसर्च प्रोजेक्ट असतात त्यांना जिल्हा पातळीवर त्यांचे रिसर्च प्रोजेक्ट सादर करण्याची संधी मिळते आणि त्यामध्ये सुरुवातीला दोन राउंड असतात, पहिल्या राउंड मध्ये तीन मिनिटांचं फ्लेक्स प्रेझेंटेशन करायचं असते.

ज्यामध्ये आपल्या रिसर्च प्रोजेक्ट बद्दल थोडक्यात माहिती द्यायची असते आणि या राउंड मध्ये जर सिलेक्शन झालं तर दहा मिनिटाचे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन करायचं आणि त्यानंतर प्रश्न आणि उत्तरांचा एक वेगळा राऊंड असतो आणि त्यानुसार मार्क असतात आणि मग नंतर जिल्हा पातळीवर निवड झालेले रिसर्च प्रोजेक्ट्स असतात ते युनिव्हर्सिटी लेव्हल ला आपला प्रोजेक्ट सादर करतात.

guhagart
कासवांच्या पाठीवर बसवले सॅटलाईट ट्रान्समीटर; स्थलांतराचा अभ्यास होणार

हा रिसर्च प्रोजेक्ट करत असताना अक्षता हिला मैत्रीण ऐश्वर्या माळवे आणि डॉ. वर्दम मॅडम , मार्गदर्शक शिक्षक प्रो. राहुल पवार यांचे मार्गदर्शन लाभले अक्षता हिला लाभले. या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आणि मिळालेले प्रोत्साहन यामुळेच मी मुंबई युनिव्हर्सिटीचे रौप्य पदक मिळवू शकले तसेच या पुढेही रिसर्च फिल्ड मध्ये काम करायला आवडेल आणी असेच विविध विषय जे समाजामध्ये फार संकुचित वृत्तीने पहिले जातात अशा विषयांवर काम करायला मी इच्छुक आहे , कारण मी मानसशास्त्र हा विषय शिकत असून त्यात संशोधनाला खूप वाव आहे !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com