esakal | स्वॅब दिलेली व्यक्ती बाहेर दिसताच बसणार दंड; मालमत्तेवर चढणार 10 हजारांचा बोजा
sakal

बोलून बातमी शोधा

स्वॅब दिलेली व्यक्ती बाहेर दिसताच बसणार दंड

स्वॅब दिलेली व्यक्ती बाहेर दिसताच बसणार दंड

sakal_logo
By
रुपेश हिराप

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : ( Savantwadi)तालुक्यातील कोरोणा रुग्णांची(Covid 19) संख्या पाच जून पर्यंत दहापर्यंत आणण्याचा निश्चय करण्यात आला आहे. त्यामुळे येथील शहर वगळता इतर तालुक्यात उद्या पासून पॉझिटिव्ह येणाऱ्या व्यक्तीला 14 दिवस संस्थात्मक विलगीकरणात (Institutional Separation)रहावे लागणार आहे. त्यासाठी दहा ठिकाणी विलगीकरणची व्यवस्था करण्यात आली आहे. तर ज्या व्यक्तीने स्वॅब दिला आहे अशी व्यक्ती घराबाहेर दिसल्यास त्याच्या घरावर किंवा जमिनीवर दहा हजार रुपयांचा बोजा दंड म्हणून चढवण्यात येणार आहे. अशी माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे ( Rajaram Mhatre)यांनी दिली.(Institutional-Quarantine-design-for-sawantwadi-village-kokan-news)

राज्याचे आरोग्य मंत्री यांनी आदेश निर्गमित करताना राज्यातील अठरा जिल्ह्यांचे गृह विलगीकरण बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे याच पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी तहसीलदार श्री म्हात्रे यांनी सरपंचांची बैठक घेऊन कोरोना आटोक्यात आणण्यास संदर्भात विविध उपाययोजना आणि सूचना बाबत मार्गदर्शन केले यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली त्यांच्यासोबत यावेळी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक उपस्थित होते.

तहसीलदार म्हात्रे म्हणाले, राज्याच्या आरोग्य मंत्री यांच्या सूचनेनुसार उद्यापासून सावंतवाडी शहर वगळता ग्रामीण भागातील गावामध्ये आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांना यापुढे गृह विलगीकरणामध्ये न ठेवता त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाणार आहे. त्यासाठी चाळीस ठिकाणी विलगीकरणाची व्यवस्था करण्यात येणार असून सद्यस्थितीत दहा ठिकाणी ही व्यवस्था उद्या पासून सुरू करण्यात येणार आहे त्यामध्ये शेर्ले कोविड सेंटर असलेली इमारत, अंबोली सैनिक स्कूल, माडखोल फार्मसी कॉलेज, रोणापाल स्वामी दयानंद संस्था, सांगली नवोदय विद्यालय, कोलगाव स्टेपिंग स्टोन स्कूल, सातार्डा हायस्कूल, माजगाव हायस्कूल, मळगाव हायस्कूल व मळेवाड शाळा नंबर 1 याठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

एखाद्याचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर त्याला थेट याठिकाणी हलवण्यात येणार आहेत, त्या ठिकाणी देगरे करण्यासाठी कर्मचार्‍यांची ही नियुक्ती करण्यात येणार आहे,त्यानंतर संबंधित व्यक्तीचे घर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. एखाद्या व्यक्तीला लक्षणे आढळल्यास आणि त्याने स्वॅब दिल्यास त्याचा रिपोर्ट येईपर्यंत त्या व्यक्तीने कुठल्याही परिस्थितीमध्ये घराबाहेर पडू नये संबधीत व्यक्ती घराबाहेर दिसल्यास त्याला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. त्या व्यक्तीने दहा हजार न भरल्यास त्याच्या घरावर अथवा जमिनीवर थेट बोजा चढवण्यात येणार आहे.

तहसीलदार म्हात्रे पुढे म्हणाले, तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा पाच जून पर्यंत दहापर्यंत आणण्याचा आम्ही निश्चय केला आहे. त्यादृष्टीने कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. सरपंच नाही तशा सूचना देण्यात आल्या असून कोणाला लक्षणे दिसून आल्यास त्याने घरीच उपचार न करता त्याला डॉक्टर कडे जाण्याचा सल्ला किंवा चाचणी करण्याचा सल्ला देण्याची सूचना सरपंचांना केली आहे.यापुढे कुठल्याही धार्मिक अथवा खाजगी कार्यक्रमाला परवानगी देण्यात येणार नाही. या कार्यक्रमाला या अगोदर परवानगी दिलेली आहे. त्या कार्यक्रमस्थळी आमच्या कर्मचाऱ्यांकडून सक्त पहारा ठेवण्यात येणार आहे. मात्र कोणी परवानगीशिवाय कार्यक्रम केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे.

हेही वाचा- कुटुंबासोबत सुट्टीत फिरायचे असल्यास 'ही' आहेत बेस्ट लोकेशन

तालुक्यातील काहींना फाजील आत्मविश्वास नडला असल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे कोणीच अंगावर काढून घरात बसू नये. कुठलेही खाजगी डॉक्टर उपचार देत नसल्यास थेट आपल्या कानावर घाला अशी सूचनाही त्यांनी यावेळी सरपंचांना केली.

असल्याचे सांगितले.

शहराची जबाबदारी ठरवून देणार..

सावंतवाडी शहरातील कोरोना उपाय योजनेबाबत उद्या आपण मुख्याधिकारी नगराध्यक्ष व त्यांच्या आरोग्य यंत्रणेसोबत चर्चा करणार आहे. त्यानंतर सावंतवाडी शहरातील नियोजन केले जाणार असून शहरातील जबाबदारी पालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडे सोपविण्यात येणार असल्याचे तहसीलदार म्हात्रे यांनी सांगितले.