कणकवली - चहा, नाष्ट्यासाठी आराम बस थांबल्यानंतर प्रवाशांच्या बॅगा लांबवून त्यातील रोकड आणि सोन्याचे दागिने चोरणाऱ्या मध्यप्रदेश येथील चौघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने गुरुवारी (ता.१०) रात्री असलदेमधील एका हॉटेलपाशी ही कारवाई केली. यातील सर्व चार संशयित मध्यप्रदेशमधील आहेत. त्यांनी चोऱ्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चारचाकी जप्त करण्यात आली आहे.