मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर रात्रीची वाहतूक सुरूच : खासगी वाहतूकीने चाकरमान्यांची गावाकडे धाव...

.मुझफ्फर खान
Thursday, 23 July 2020

कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यांतर्गत प्रवासाला बंदी आहे. मात्र

 चिपळूण(रत्नागिरी) : कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यांतर्गत प्रवासाला बंदी आहे. मात्र मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर रात्रीची खासगी वाहतूक जोरात सुरू आहे. मुंबईतील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर कोकणात दाखल होत आहेत. जिल्ह्याच्या सीमेवर आरोग्य विभागाचे पथक कार्यरत असले, तरीही अनेक प्रवासी तिथे कोणतीही नोंद न करता निघून जात असल्याचे प्रकारही घडत आहेत. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाऊन’ यामुळे राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर राज्याबाहेरील अनेक मजूर, कामगार यांच्या समस्या लक्षात घेता त्यांच्या सोयीसाठी एसटी बसची व्यवस्था करण्यात आली होती. खासगी वाहतूकीला पूर्णपणे बंदी घातलेली असताना मुंबई - गोवा महामार्गावर खासगी वाहतूक सुरू आहे. अनेक खासगी कंपन्यांच्या ट्रव्हल्स मुंबईतून रत्नागिरी ते सिंधुदुर्गात येत आहेत. यातून प्रवाशांची ने-आण सुरू आहे. त्याशिवाय कोकण रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या दोन रेल्वे गाड्यांमधूनही प्रवास दाखल होत आहेत.

हेही वाचा- गुगल अ‍ॅपवर नोंद :  चिपळूण पालिकेचे पथक पोहचले 9 हजार 470 लोकापर्यंत.. -

रेल्वे मार्गावर मंगला, नेत्रावती या प्रवासी गाड्या सुरू आहेत. या दोन्ही गाड्यांमध्ये राज्यांतर्गत प्रवासाला परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र, मुंबईकर चाकरमानी हे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या हद्दीबाहेरील स्थानकांचे तिकीट काढून प्रवास करू लागले आहेत. मंगला आणि नेत्रावती एक्सप्रेसला चिपळूण व रत्नागिरीमध्ये थांबा आहे. दोन्ही गाड्या येथे पाणी भरण्यासाठी थांबतात. त्याचा फायदा घेत चाकरमानी जिल्ह्यात दाखल होऊ लागले आहेत.

हेही वाचा- वेध गणेशोत्सवाचे :  गावाकडे यायचे असेल तर चाकरमान्यांना आता एवढे दिवस व्हावे लागणार क्‍वारंटाईन... -

सुरुवातीच्या काळात या दोन्ही गाड्यांमधून आठ ते दहा प्रवासी दाखल होत होते. मात्र, आता ही संख्या वाढत चालली आहे. दिवसाला तीस ते चाळीस प्रवासी दररोज जिल्ह्यात दाखल होत आहेत. रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर तेथून प्रवासी पळून जातात त्यामुळे प्रवाशांच्या नोंदी करून घेताना आरोग्य कर्मचारी, रेल्वे सुरक्षा बल कर्मचार्‍यांचीही तारांबळ उडत आहे

हेही वाचा-.सुस्कारा : आ वैभव नाईक यांच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह..कोणाचे वाचा- -

ग्रामीण भागात खासगी वाहतूक करणारी वाहने बंद आहेत. कोणी खासगी कामासाठी निघाला तरी आरटीओचे अधिकारी त्यांच्यावर कारवाई करतात. आता मुंबई - गोवा महामार्गावर सुरू असलेल्या खासगी वाहतूकीवर आरटीओने कारवाई करावी. 

वैभव शिंदे, रिक्षा प्रवासी वाहतूक संघटना 
चिपळूण

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Intra-state travel is prohibited but night traffic on the Mumbai-Goa National Highway is in full swing