कोरोनाची धास्ती अन् या बंदरांवर आहे गस्ती....

 Investigation has begun at nine ports in the ratnagiri district through the health department and the port department
Investigation has begun at nine ports in the ratnagiri district through the health department and the port department
Updated on

रत्नागिरी - कोरोनाच्या धास्तीने जिल्ह्यात आरोग्याबाबत प्रचंड खबरदारी बाळगली जात आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 9 बंदरांवर आरोग्य विभाग आणि बंदर विभागामार्फत तपासणी सुरू झाली आहे. येणार्‍या बोटी किंवा मोठ्या कार्गोवर या दोन्ही यंत्रणा डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, या दृष्टीने बंदर विभागाने ही सतर्कता बाळगली आहे. 

राज्यामध्ये सध्या 133 संशयित रुग्ण भरती झाले आहेत. राज्यात सध्या वेगवेगळ्या विलगीकरण कक्षामध्ये शेकडोंची भरती झाली आहे. त्यातील 17 जण पॉझिटिव्ह आहेत. सध्या पुणे येथे 18 जण, मुंबई येथे 35, नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 18 जण, यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 9 जण तर पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात 3 संशयित रुग्ण भरती करण्यात आले आहेत. राज्यात आतापर्यंत बाधित भागातून 818 प्रवासी आले आहेत. साथरोग प्रतिबंध करण्याच्या उपाययोजनांसाठी त्या-त्या भागातील व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे आणि बस या अत्यावश्यक सेवादेखील सुरु राहतील. तसेच महानगरांमधील मॉल्स आणि हॉटेल सुरु राहणार आहेत. मात्र, नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केले.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देश आणि राज्याबरोबर जिल्ह्याची आरोग्य आणि प्रशासन यंत्रणा सज्ज आहे. त्या अनुषंगाने कोरोनाबाबत जनजागृती, खबरदारी यावर भर दिला आहे. परदेशातून येणार्‍या प्रवाशांना तपासणी केल्याशिवाय जिल्ह्यात प्रवेश न देण्याचा निर्णय झाला आहे. तसेच जिल्ह्यातील 9 बंदरांवर आरोग्य आणि बंदर विभागाचे विशेष लक्ष आहे. 

प्रत्येक बंदरावर व्यक्तीची नियुक्ती

बंदरांवर परदेशातून येणारी मोठी जहाजे, कार्गो, बोटी येतात. परदेशातून येणार्‍या लोकांशी थेट संपर्क येतो. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग किंवा फैलाव होऊ नये यासाठी प्रत्येक बंदरावर बंदर विभागाच्या व्यक्तीची नियुक्ती केली आहे. येणार्‍या बोटी, जहाज, कार्गो आदींची माहिती दररोज बंदर विभागाला दिली जाते. बंदर विभाग ही माहिती जिल्हाधिकार्‍यांना देते. त्यामुळे तत्काळ पुढील कार्यवाही केली जाते. बंदर विभागाने याला दुजोरा दिला.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com