गडनदी पुलावरील भराव खचला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

कणकवली - महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आणि त्याचा दर्जा पावसाला सुरुवात होण्यापूर्वी संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गडनदी पुलाजवळील भराव आज सायंकाळी खचला. हा प्रकार लक्षात येताच नागरिक, वाहनचालक संतप्त झाले. त्यांनी वाहतूक रोखून धरली. घटनास्थळी पोहोचलेल्या प्रांत, तहसीलदार आणि पोलिस निरीक्षकांनी ठेकेदाराच्या यंत्रणेला तंबी देत तत्काळ भरावी करावा, अशी सूचना केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. 

पावसाच्या तोंडावर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे तीन-तेरा वाजले आहेत. कणकवलीचे नागरिक गेले पंधरा दिवस त्रस्त असून सातत्याने भराव खचत आहेत. आज तर कहर झाला. गडनदीवरील नवीन पूल बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भराव खचला. तेथे पुलाच्या तोंडावर टाकलेला भराव निकृष्ट दर्जाचा होता. काल (ता.19) सायंकाळी झालेल्या पावसानंतर भराव हळू खचू लागला. आज दुपारनंतर पुलाकडेला मोठे भगदाड पडले. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्‍यता होती. नागरिकांना याची माहिती मिळताच गडनदी पुल परिसरात जमाव दाखल होऊ लागला. 

घटनास्थळी कन्हैया पारकर, संदीप सावंत, मिलिंद मिस्त्री आदी विविध पक्षाचे कार्यकर्ते गोळा झाले. त्यांनी वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतला. याचवेळी तहसीलदार संजय पावसकर तब्बल अर्धा तास दिलीप बिल्डकॉनच्या कामगारांची वाट पाहत होते. त्यानंतर पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नागरिकांनी रस्ता रोखला. घटनास्थळी प्रांत चंद्रकांत मोहिते हेही दाखल झाले. त्यांनी महामार्ग प्राधिकरणच्या अभियंत्यांशी चर्चा करून तत्काळ भराव करावा, अशी सूचना केली. त्यानंतर दिलीप बिल्डकॉनच्या अभियंत्यांनी घटनास्थळी येत हे काम एका रात्रीत पूर्ण करून देतो, असे आश्‍वासन दिले. यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. 

धोका कायम 
महामार्गाच्या पर्यायी रस्त्यांचीही भराव खचत असून रस्ता वाहतुकीस धोकादायक बनत चालला आहे. मुसळधार पावसात मोठी दुर्घटना होण्याची शक्‍यता असून वेळीच लक्ष न घातल्यास नागरिकांचा जीव जाण्याची भिती आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: issue of Gadnadi bridge